‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…
नेमकं काय घडलं?
आरोपीचं नाव देवांश पाठक असे आहे. मृतक अल्पवयीन ही बीसीए (BCA) प्रथम वर्षात शिकत होती. घटनेच्या दिवशी तिचे आई-वडील हे मूळ गावी गेले होते. तर तिची मोठी बहीण कॉलेजमध्ये होती. मोठी बहीण घरी परतल्यावर ती पहिल्या मजल्यावर गेली असता तिला बहिणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. हे दृश्य बघून ती खूप घाबरली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासासाठी आवश्यक ते पुरावे गोळा केले. पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला अटक केली आहे.
हत्यामागचे कारण काय?
पोलिसांनी आरोपी देवांश पाठक याची चौकशी केली असता त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी आणि मृत मुलगी गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी एकत्र शिक्षणही घेतले होते. मृत विद्यार्थिनी दुसऱ्या एका तरुणाशी बोलत असल्याचा संशय देवांशला आला होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता आणि एकमेकांशी बोलणेही बंद झाले होते. बुधवारी (5 जुलै) दुपारी देवांश संभाषणाच्या बहाण्याने तिच्या घरात शिरला. तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात देवांशने चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली.
हत्येपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप
मृत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. कुटुंबाचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणात बीएनएसचे कलम 66 आणि पोक्सो (POCSO) कायद्याची कलमे वाढवली आहेत. पोलिसांनी आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहे.
पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…
Ans: लखनऊतील तिच्याच घरात.
Ans: दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय.
Ans: आरोपी प्रियकराला अटक करून POCSOसह गंभीर कलमे लावली.






