Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi Accident: हृदयद्रावक! पार्किंगमध्ये खेळताना काळाचा घाला; सेप्टिक टँकमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी

भिवंडीतील फरीद बाग परिसरात पार्किंगमध्ये खेळताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय मोहम्मद अहमद मसूद टँकमध्ये पडला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 09:49 AM
crime (फोटो सौजन्य: AI)

crime (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • पार्किंगमधील सेप्टिक टँकचे झाकण तुटून चिमुकला आत पडला.
  • स्थानिकांनी तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
  • इमारतीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप.
भवंडी: भिवंडी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळात असतांना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून शोकाला पसरली आहे. घडलेली घटना फरीद बाग परिसरात घडली. (Bhiwandi Accident)

Pune Crime: तरुणीला पाण्यात ढकलून आरोपीनेही मारली उडी; तरुण वाचला मात्र…

काय घडलं नेमकं?

या दुर्दैवी घटनेतील मृत्यू झालेल्या चिमुकल्याचा नाव मोहम्मद अहमद मसूद असे आहे. १५ जुन हा विध्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस त्यामुळे विध्यार्थ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली होती. दुपारी वडील मसूद हे आपल्या मोठ्या मुलाला शाळेतून घरी घेऊन आले. त्यांनतर लहानगा मोहम्मद अहमदत हा राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये मुलांसोबत खेळण्यासाठी गेला. खेळतांना तो पार्किंगमधील सेप्टिक टँकवर ठेवलेल्या पत्र्याच्या झाकणावर चढला. (Bhiwandi Accident) मात्र, हे झाकण आधीपासूनच खराब व कमकुवत अवस्थेत होते. त्यामुळे तो अचानक आत कोसळला आणि मोहम्मद अहमद थेट सेप्टिक टँकमध्ये पडला.

या घटनेनंतर खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरडा करत घरच्यांना आणि नागरिकांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत चिमुकल्याला बाहेर काढले आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने चिमुकल्याच्या आई वडिलांनी टाहो फोडला.(Bhiwandi Accident)

तपास सुरु

निजामपूरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप

इमारतीच्या देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतींमध्ये सुरक्षेच्या मूलभूत सुविधांकडे बिल्डर आणि सोसायटी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. (Bhiwandi Accident)

Pune Crime : विश्रांतवाडीत टोळक्याचा राडा, दोघांवर वार अन् दहशतही; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत बालकाचे नाव काय होते?

    Ans: मोहम्मद अहमद मसूद असे मृत बालकाचे नाव होते.

  • Que: ही घटना कशी घडली?

    Ans: खेळताना चिमुकला सेप्टिक टँकच्या जीर्ण झाकणावर चढला आणि झाकण तुटल्याने तो आत पडला.

  • Que: घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: निजामपूरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Bhiwandi accident heart wrenching tragedy strikes while playing in the parking area 5 year old boy loses his life after falling into a septic tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • bhiwandi
  • Bhiwandi Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.