काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत तरुणीचे नाव स्वप्नाली भांगरे असे आहे तर रमेश बबन कडाळे असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी रमेश बबन कडाळे या तरुणाने स्वप्नाली भांगरे या तरुणीसोबत झटापट करून तिला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे. स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपी रमेश कडाळेने स्वतः पाण्यात उडी मारली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी रमेश कडाळेला स्थानिकांनी वाचविले होते. मात्र, स्वप्नाली ही तरुणी पाण्यात वाहून गेली होती.
18 तासानंतर मुलीचा मृतदेह सापडला
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली. तब्बल 18 तासांनंतर सोमवारी स्वप्नाली भांगरे चा मृतदेह सापडला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबन कडाळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना कश्यामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहे.
विश्रांतवाडीत टोळक्याचा राडा, दोघांवर वार अन् दहशतही; नेमकं काय घडलं?
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार जणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत दोन तरुणांवर वार केले अन् नंतर परिसरात हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, तिघे अद्यापही फरार आहेत. शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गन्हा नोंद केला आहे. हा प्रकार येथील पंचशीलनगर येथील दयावान समाज मंदिराजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला आहे.
Breaking: राजस्थानच्या बिकानेरमध्ये कार अन् ट्रकची भीषण धडक; ६ जणांचा जागेवरच मृत्यू






