
crime (फोटो सौजन्य: social media)
बिहार: बिहार येथील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका तरुणीचा अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर हे घृणास्पद प्रकरण करून तिला २४ तासानंतर तिच्या गावी आणून सोडलं. या प्रकरणाबाबत पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये एफआरआय दाखल केली आहे. यात गावातील चार आरोपी तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारीत काय?
पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, “माझ्या मुलीचं त्याच गावातील दोन आणि बाघाखाल गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी अपहरण केलं. त्या नराधमांनी मुलीचं अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळताच आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तिच्याबद्दल आम्हाला काहीच कळालं नाही. आरोपी तरुणांनी पीडितेला अपहरण करून तिला 24 तासांनंतर पुन्हा तिच्या गावात आणून सोडलं. घरी परतल्यानंतर, पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत कुटुंबियांना सांगितले. आणि त्यांनतर मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली.
पोलीस तपास सुरु
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध कारवाई सुद्धा सुरू झाली आहे.संबंधित घटनेची तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत गायघाट पोलीस स्टेशन हद्दीतील बाघाखाल गावात राहणाऱ्या जितेंद्र कुमार नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तसेच, इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस छापे टाकत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. आता प्रकरणाचा सर्व बाजूंनी विचार केला जात असून पोलीस याबाबत पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.
Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये लॉ प्राध्यापिकेचा मोबाईल हॅक; ९० किमी दूरून व्हॉट्सअपमध्ये अनधिकृत लॉगिन
Ans: बिहार
Ans: चार
Ans: एक