crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक 22537) एसी कोच बी-2 च्या बाथरूममध्ये कचराकुंडीत 7-8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आलाय. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेने मात्र एकाच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आज (23 ऑगस्ट) रोजी दुपारी .5 वाजताच्या सुमारास कुशीनगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचली. ही ट्रेन येथून परत येते
आणि काशी एक्सप्रेस (१५०१७) म्हणून पुढे जाते. अशातच, ट्रेनच्या साफसफाई दरम्यान, स्वच्छता प्रभारींनी बाथरूममध्ये डोकावले असता यावेळी कचराकुंडीत एका निष्पापाचा मृतदेह त्यांना दिसून आला.
त्यांने ताबडतोब दुपारी 1.50 वाजताच्या सुमारास स्टेशन व्यवस्थापकांना याची माहिती दिली. त्यानंतर, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या संबंधित प्रत्येक पैलूची चौकशी करण्यात येत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच संपूर्ण तपशीलवार अहवाल पाठवला जाईल. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मात्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आधी महिलेची हत्या, नंतर ७ महिन्यांच्या बाळाची विक्री; गोंदियातील ‘त्या’ हत्येचा उलगडा
गोंदियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदियाच्या सडक- अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा झाल्याचं समोर आलं आहे. केवळ हत्याची नाही तर त्या मृत महिलेच्या ७ महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करीत ७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा उलगडा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
३ ऑगस्ट रोजी खजरी शेतशिवारात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या महिलेची हत्या धारधार शास्त्राने वार करून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर खजरी येथील पोलीस पाटील इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली. मृत महिलेचे नाव अन्नु नरेश ठाकुर (21) रा. भिलाई, दुर्ग, छत्तीसगड असल्याचे निष्पन्न झाले.
अभिषेक सिद्धार्थ तुरकर (36) रा. भिलाई, ह.मु. डोंगरुटोला गोरेगाव, गोंदिया हा अन्नुशी अनैतिक संबंधात होता. मोठ्या कर्जामुळे पैश्यांच्या गरजेतून त्याने पत्नी पूनम तुरकर, नातेवाईक प्रिया तुरकर आणि साथीदार चांदणी रा. नेहरू नगर, भिलाई यांच्या मदतीने कट रचला. 2 ऑगस्टला अभिषेकने अन्नुला खजरी शेतशिवारात नेऊन चाकूने हत्या केली. नंतर तिच्या 7 महिन्याचा मुलगा धनराज याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून मुलाची विक्री करण्यात आली. या प्रकणातील खून करणारे आणि बाळाची खरेदी करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.