Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

इंदूरमध्ये MBA विद्यार्थिनीच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली. आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेहाचा अवमान, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि अघोरी कृत्य केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघड झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 10:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • MBA विद्यार्थिनीची निर्दयी हत्या
  • मृतदेहावर अत्याचार पुरावे नष्ट करण्यासाठी मुंबईत पलायन
  • ‘अघोरी विद्या’ करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथे एक भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना आहे. एका प्रियकराने आधी आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यांनतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. त्याने बदला घेण्यासाठी काही खासगी फोटो देखील व्हायरल केले. एवढेच नाही तर प्रेयसीची आत्मा बोलावण्यासाठी त्याने अघोरी कृत्य देखील केल्याचे समोर आले आहे. ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल. पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जाणून घ्या काय घडलं नेमकं?

नेमकं काय घडलं?

आरोपीचे नाव पियुष धामनोतिया असे आहे. तर मृतक ही एमबीए ची विद्यार्थिनी होती. १० फेब्रुवारी रोजी पियुष त्याच्या प्रेयसी सोबत तिच्या घरी गेला होता. त्याने तिच्याकडे शारीरिक मागणी केली. मात्र तिने याला नकार दिला. त्याने तिला दोरीने बांधले आणि तिचे डोळे झाकून तिला ‘गिफ्ट’ देण्याचे नाटक केले. तिने विरोध करताच त्याने तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्या छातीवर चाकूने वार केला. या वार इतका जोरदार होता की चाकूचे थेट दोन तुकडे झाले. त्याच्या प्रेयसीचा यात मृत्यू झाला. या नंतर जे काही घडलं ते भयंकर घडलं.

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

बिअर प्यायली आणि…

हत्येनंतर तो बाहेर गेला, त्याने बिअर विकत आणली. त्याने मृतदेहाशेजारी बसून ती बिअर प्यायली. त्यांनतर त्याने मृदेहावर लैंगिक अत्याचार केले. त्यांनतर तरुणीला नग्न अवस्थेत सोडून तिथून पळून गेला.

अघोरी कृत्य

हत्येनंतर पियुष पनवेलमार्गे मुंबईला पळून गेला. तिथे तो हॉटेलमध्ये राहिला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचा फोन तोडून टाकला. पनवेलमधील एका निर्जन कोपऱ्यात त्याने अगरबत्ती लावली, त्याने यूट्यूबवर ‘आत्मा कशी बोलावयाची’ याचे व्हिडिओ पाहून अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला मृत मुलीच्या आत्म्याशी बोलायचे होते आणि तिची माफी मागायची होती, असा दावा त्याने केला आहे.

खाजगी फोटो केले व्हायरल

पियुषने मृत मुलीची बदनामी करण्यासाठी त्यांचे काही खाजगी व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर शेअर केले आणि तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही अपलोड केले.

दोघांमध्ये सुरु होते वाद

मृतक दुसऱ्या एका मुलाशी डेटिंग ॲपवरून बोलत होती, ज्यामुळे तो असुरक्षित झाला होता. तसेच लग्नासाठी तिच्या घरच्यांचा नकार असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. असे त्याने कारण सांगितले आहे.

पोलीस तपास सुरु

10 फेब्रुवारी हत्येच्या दिवशी पियुष त्या विद्यार्थिनीसोबत तिच्या घरी गेला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे एकत्र घरात जाताना दिसले, मात्र अडीच तासांनंतर पियुष एकटाच बॅग घेऊन बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी सांगितले की आरोपी मानसिकदृष्ट्या विचलित झाला असल्याचे भासवत आहे. मात्र, घटनेच्या वेळी त्याने केलेले नियोजन हे अतिशय थंड डोक्याने केलेला गुन्हा असल्याचे दर्शवते. पोलीस या हत्येचा सखोल तपास करत आहेत. आता या प्रकरणात आणखी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: हत्या, मृतदेहाचा अवमान, पुरावे नष्ट करणे आणि सायबरद्वारे बदनामी.

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: पोलिसांनी मुंबईतून अटक करून कोठडीत घेतले.

  • Que: तपासात काय धक्कादायक उघड झाले?

    Ans: हत्येनंतर मृतदेहाशेजारी बसून मद्यपान आणि अघोरी कृत्याचा प्रयत्न.

Web Title: Madhya pradesh crime first the murder of the girlfriend torture on the body heinous acts and photos horrific incident in indore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bengaluru Crime: ‘बेडवरून पडली’ असं सांगितलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केलं धक्कादायक सत्य; बापावरच हत्येचा गुन्हा
1

Bengaluru Crime: ‘बेडवरून पडली’ असं सांगितलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केलं धक्कादायक सत्य; बापावरच हत्येचा गुन्हा

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार
2

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर
3

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.