crime (फोटो सौजन्य: social media)
परभणी: परभणी जिल्ह्यातील मानवत येथे हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील आरोपीचा मृतदेह सापडला असून ती आत्महत्या आहे की हत्या याचा शोध घेणं आता पोलिसांसमोर आवाहन उभं आहे. आरोपीने खून केल्यानंतर आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत आरोपीचे नाव मारोती चव्हाण असे आहे.
२६ जुलै रोजी टेम्पो चालक ज्ञानेश्वर पवार यांची मानवत येथे हत्या झाली होती. ही हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. त्याच आरोपीचा मृतदेह आता मानवात शिवारातील एका शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या आहे याचा पेच पोलिसांसमोर आहे. या आरोपीने ज्ञानेश्वर पवार यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
परभणीच्या मानवत शहरातील कोक्कर कॉलनी भागात राहणाऱ्या टेम्पो चालक ज्ञानेश्वर पवार यांची 26 जुलै रोजी डोक्यात कुदळ मारून हत्या करण्यात आली होती. ही हत्या केल्यानंतर आरोपी मारोती चव्हाण हा फरार झाला होता. पोलिसांची विविध पथके या आरोपीचा शोध घेत होते. शोध सुरु असतानाच मानवत शिवारातील आंबेगाव नका परिसरातील एका विहिरीत आरोपी मारोती चव्हाण याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
मालेगावात तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून; तोंडावर, मानेवर केले सपासप वार
दरम्यान, पूर्ववैमनस्यातून कुरापत काढून तिघा जणांनी मनपा कंत्राटी कर्मचारी असलेल्या नितीन उर्फ रितीक अर्जुन निकम (वय २५, रा. जयभीमनगर, आयशानगर) याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. लाकडी दांडक्याने व चाकूने हल्ला करून तसेच चेहरा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री जुना आग्रारोडवरील एका शोरूमजवळ घडली.
याप्रकरणी छावणी पोलिसांनी संशयित आरोपी सचिन अहिरे उर्फ सच्या माया याला अवघ्या काही तासात अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ विशाल अर्जुन निकम यांनी फिर्याद दिली आहे. विशालचा भाऊ नितीन याला सचिन अहिरे व अन्य अल्पवयीन संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. धारदार चाकूने गंभीर वार केले.
तसेच चेहऱ्यावर दगड टाकून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या खुनाची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
Amaravati Crime News: अमरावती हादरलं! घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; शहरात खळबळ