परभणीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तीव्र टीका करत 'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी' असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी बंडखोर खासदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतही…
Tukaram Mundhe News: पालक सचिवांना विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वर्षातून चार वेळा, म्हणजेच किमान दर तीन महिन्यांनी एकदा, आपल्या जिल्ह्याला भेट देणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या विकासासाठी विशिष्ट उपाययोजना सुचवणे आणि त्या…
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला आहे. यामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ढीगाऱ्याखाली 30 ते 40 भाविक अडकल्याचे समोर येत आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावात गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चुलत बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली…
परभणी-पाथरी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात मानवत येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिस तपास सुरू आहे.
Parbhani Hingoli MLC Election 2026: उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षातील आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी इच्छुकांकडून मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.
धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गोदावरी नदीचे पात्र कोरडे ठणठणीत झाले आहे. धरणातून पाणाचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.
२०२६-२७ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व ने नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई 1 येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली.
परभणीत काँग्रेस पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेसारखी भूमिका घ्यायची का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
दिवाळीच्या रात्री वालूर येथे वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून तरुणाची हत्या करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मुख्य आरोपी बाबुराव पवार अटकेत असून झरी व पार्डीतील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
परभणीत कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने गावी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या दुचाकीला कारची भीषण धडक बसली. मध्यरात्री झालेल्या या अपघातात तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.
मानवत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना मानवत रोड ते परळी रेल्वेसाठी केंद्रात पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी दिले आगे.
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर येथे विशेष भेट घेत विकास आराखडा मांडला यामुळे जांभूळबेट विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे एका तरुणाने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव माणिक कारभारी खोसे (वय २५) आहे.
एका शिक्षकाने विद्यार्थीनीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर शिक्षकाने एआयचा वापर करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि तिला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार…
परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा…