
BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
या प्रकरणी आणखीन एक व्यक्ती माखनलाल मीणावरील आरोपही सिद्ध झाले असून त्याला 3 वर्षांच्या कठोर कारावासासह 25,000 दंड ठोठावण्यात आला आहे.
केंद्रीय तपास पथक (सीबीआय)ने या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय कार्यालय जयपुरच्या वतीने 3 जून 2016 ला दिलेल्या लिखित तक्रारीच्या आधारे 9 नोव्हेंबर 2016 ला गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीत बँक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालिन ब्रँच मॅनेजर राम भरोसे मीणावर आपल्या पदाचा दुरुपयोग आणि फसवणूक तसेच बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला आर्थिक नुकसान पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला होता.
खलनायिकेच्या भूमिकेने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास
आरोपांनुसार, 15 जानेवारी 2015 ते 6 मे 2015 या कालावधीत मीणाने वैध कर्ज अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि पुरेशी सुरक्षा न घेता १७ खात्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने कर्ज मंजूर केले. सीबीआयच्या मते, यामुळे बँकेला 3.61 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
तपास पथकाने या संदर्भात संपूर्ण तपास केल्यानंतर राम भरोसे मीणा आणि माखन लाल मीणाविरोधात 9 जुलै 2020 रोजी चार्जशीट दाखल केली. चार्जशीट दाखल केल्यानंतर न्यायालयाने 1 डिसेंबर 2021 ला दोन्ही आरोपीविरोधात आरोप निश्चित केले व प्रकरणाच्या पुढील सुनावणीस सुरुवात झाली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालसमोर तपास पथकाच्या वतीने आरोपांशी निगडीत साक्षीदार व पुरावे सादर करण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सीबीआय न्यायालय, जयपुरने दोघांना या प्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने राम भरोसे मीणाला 7 वर्षे व 2.85 लाखांची तर माखन लाल मीणाला 3 वर्षे व 25 हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.
नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप