Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Case: ‘संयमाची परीक्षा पाहू नका’,अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा CID ला इशारा

Akshay Shinde Encounter Case: बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या पोलिस कोठडी मृत्यूप्रकरणाचा तपास गांभीर्याने न केल्याबद्दल न्यायालायाने केंद्रीय तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2024 | 12:14 PM
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा CID ला इशारा (फोटो सौजन्य-X)

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा CID ला इशारा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai High Court News In Marathi : महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीआयडीला (CID) खडसावले आहे. सीआयडी या प्रकरणाचा तपास हलक्यात घेत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सर्व प्रकरणांच्या निःपक्षपाती तपासावर भर देत सध्याच्या प्रकरणातील सीआयडीची वर्तणूक संशयास्पद असल्याचे देखील म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने सांगितले की, “चांगल्या तपासासाठी, स्थानिक पोलिसांकडून प्रकरणे घेतली जातात आणि सीआयडीकडे दिली जातात. सर्व कागदपत्रे गोळा करून योग्य तपासासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवली जावीत असा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक बाबतीत निष्पक्षता असली पाहिजे. येथेही तपासाचा अधिकार आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांना आहे.” त्यानंतर सर्व कागदपत्रे आणि माहिती दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली असून ते एका आठवड्यात सुपूर्द करण्यात येतील, असे खंडपीठाला सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना; केवळ 8 महिन्यांत 230 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. अक्षयने पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय जागीच ठार झाला. या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अक्षयच्या पालकांनी उच्च न्यायालयात केली होती.

आरोपीने पाणी मागितल्याने त्यांच्या हातकड्या काढल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याला व्हॅनमधील बाटलीतून पिण्यासाठी पाणी देण्यात आले. या पोलिस चकमकीनंतर शिंदे कुटुंबीयांच्या मागणीवरून स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे तपास सोपवण्यात आला.

अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी आपल्या मुलाला बनावट चकमकीत मारल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांना प्रश्न विचारले होते. आरोपीच्या डोक्यात गोळी कशी लागली, तर कुठे गोळीबार करायची याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते, अशी विचारणा न्यायालयाने केली. यावेळी पिस्तुलाचे बोटांचे ठसे आणि हात धुतले पाहिजेत, असे न्यायमूर्ती चव्हाण यांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते.

संयमाची परीक्षा पाहू नका!

तुमच्या कार्यपद्धतीमुळेच तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुम्ही नेमका काय तपास केला? तुम्हाला वारंवार मुदत देऊनही वैद्यकीय कागदपत्रे का गोळा केली नाही? तुम्ही जाणीवपूर्वक त्यास विलंब करीत आहात का? आता आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अशा शब्दांत खंडपीठाने सीआयडीची कानउघाडणी केली.

पुढील सुनावणी 20 जानेवारी 2025

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याला २४ सप्टेंबर रोजी तळोजा कारागृहातून ठाण्यात नेले जात होते. अक्षयने पोलिस व्हॅनमधील पोलिस कर्मचाऱ्याकडून पिस्तूल हिसकावले आणि त्याच्यावर गोळीबार केला, त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाला. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या एका पोलिसाने गोळीबार केला, त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारी 2025 रोजी निश्चित केली आहे. त्या दिवशी न्यायदंडाधिकाऱ्यांना कोर्टात आपला अहवाल सादर करायचा आहे.

 पुण्यात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून तीन तरुणींची सुटका

Web Title: Bombay high court raps cid for taking badlapur encounter probe lightly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 12:14 PM

Topics:  

  • Badlapur
  • Bombay High Court

संबंधित बातम्या

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा
1

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

Shree Chandrashekhar: श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची शिफारस
2

Shree Chandrashekhar: श्री चंद्रशेखर होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश? सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची शिफारस

Bombay High Court: पत्नीला पतीला नपुंसक म्हणण्याचा अधिकार आहे; मुंबई उच्च न्यायालयाने मानहानीची याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?
3

Bombay High Court: पत्नीला पतीला नपुंसक म्हणण्याचा अधिकार आहे; मुंबई उच्च न्यायालयाने मानहानीची याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?

१८७ प्रवासी मृत्युमुखी तरी लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष? हलगर्जीपणा अन् तपासातील त्रुटींचा परिणाम
4

१८७ प्रवासी मृत्युमुखी तरी लोकल बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष? हलगर्जीपणा अन् तपासातील त्रुटींचा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.