crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती हा पत्नीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नी आणि प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीचा नवरा अडथळा ठरत असल्याकने काटा काढण्यासाठी प्रियकरानं थरारक कट रचल्याच समोर आलं आहे. संतोष उर्फ छोटू काळे असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या तिघांना संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पैशांचा किरकोळ वाद बेतला जीवावर; तरुणाने चाकूने सपासप वार करत केली हत्या
नेमकं काय घडलं?
नाशिक- मुंबई महामार्गालगत गरवारे बस थांब्याजवळ शनिवारी सकाळी संतोष काळे याचा मृतदेह आदळून आला. दगडाने ठेचून झालेल्या या खुनामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपस सुरु केला आहे. संतोषची पत्नी पार्वती काळे (वय 30) हिचे प्रफुल्ल कांबळे (वय 36) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. या नात्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. दोन दिवसांपूर्वीची संतोष व पार्वती यांच्यात टोकाचे भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यामुळे पत्नी पार्वती आणि तिचा प्रियकर प्रफुल्ल यांनी संतोषचा कायमचा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. या कटात योगेश बाळासाहेब जाधव आणि एका तरुणानेही साथ दिली. संतोष घरी परतला नाही, तेव्हा घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. डोक्यावर मोठ्या दगडाने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट पोलिसांना झाले.
तीन आरोपींना अटक
यानंतर संतोषचे वडील अशोक काळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पार्वती काळे, तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे, जाधव तसेच एका अल्पवयीनाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना रविवारी न्यायालयात हजार करण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुढील तपासासाठी १७ सेप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी इंदिरानगर पोलिसांनी विशेष पथक नेमले. हत्यांमागील अचूक कारण, नियोजन व त्यातील इतर तपशील शोधण्याचे काम सुरू आहे. घटनेत वापरलेलं शास्त्र व इतर पुरावे जप्त करण्यात आले असून, पुढील चौकशीदरम्यान अनेक धक्कदायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू