Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा शहरातील एका शाळेतील आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या टोकाच्या पावलामागील कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 09:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आठवीतील दोन विद्यार्थ्यांची दोन दिवसांत आत्महत्या
  • दोघांनीही आपल्या राहत्या घरी गळफास घेतला
  • वय अवघे 14 वर्षे; पालक व शिक्षकांमध्ये चिंता
बुलढाणा: बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन आठवीतील वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय घडलं नेमकं?

११ फेब्रुवारी,बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्रपती नगर परिसरात घडली आहे. भारत विद्यालयात आठवीत शिकणारा नमन अरुण राऊत हा विध्यार्थी घरी एकटाच होता. त्याचे आई आणि वडील दोघेही पेशाने शिक्षक आहे. ते आपल्या कर्तव्यावर बाहेरगावी गेले होते. दरम्यान, नमनने राहत्या घरातील अभ्यास करण्याच्या खोलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

वर्गमित्राने देखील आत्महत्या केली

14 फेब्रुवारी, शनिवारी सायंकाळी ५ वाजता नमनच्या वर्गमित्राने देखील टोकाचे पाऊल उचलले आहे. अथर्व वैभव राणे असे आत्महत्या करण्याऱ्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अर्थव हा सुंदरखेड परिसरात राहत होता. त्याचे वडील कारागृह पोलीस म्हणून कार्यरत आहेत. शाळेतून घरी परतल्यानंतर अर्थवणे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपला आयुष्य संपवला.

या दोन्ही घटनेने बुलढाणा शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दोन्ही १४ वर्ष्याच्या मुलाने आपले आयुष्य का संपवले याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे. पोलीस आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सगळ्या दिशेने तपास करत आहेत. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्यावर असलेल्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे एका तरुण शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध पियुन टोकाचा पाऊल उचलल्याचे समोर आले. या घटनेत ३४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाली तर पत्नी थोडक्यात बचावली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरु आहेत.

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन्ही विद्यार्थ्यांचे वय किती होते?

    Ans: दोघेही अवघे 14 वर्षांचे होते आणि आठवीत शिकत होते.

  • Que: आत्महत्येचे कारण समोर आले आहे का?

    Ans: नाही, अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही; पोलिस तपास करत आहेत.

  • Que: या घटनेचा समाजावर काय परिणाम झाला?

    Ans: पालकवर्ग आणि शिक्षणक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Buldhana news shocking incident in buldhana two eighth grade classmates commit suicide by hanging themselves in two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.