crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बुलढाणा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील चिखली रोडवरील ग्रीन लीप हॉटेल जवळ एका १९ वर्षीय तरुणाची दिवसाढवळ्या निर्घृणपणे चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. मृतकाचे नाव सनी सुरेश जाधव असं आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चार आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी कोठडी सुनावली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून उर्वरित दोघांचा शोध घेत आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकाच खळबळ उडाली आहे.
बाणेर पोलिसांची मोठी कारवाई; मोबाईल चोर अन् चैन स्नॅचरच्या आवळल्या मुसक्या
पुण्यातून चोरीसंदर्भात एक बातमी आली आहे. पुणे शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावण्याच्या घडत असतानाच बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोबाईल चोर आणि चैन स्नॅचरच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले चैन व मोबाईल जप्त केला आहे.
पहिल्या चैन चोरीच्या घटनेत शफिक मोदीन शेख (वय २६, रा. तलवडे) तसेच मोबाईल चोरीप्रकरणात फिरोज अब्दुल कुददुसशहा (वय २१, रा. गणेशनगर, वाकड) या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यात बालेवाडीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील दोन चोरट्यांनी दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावली होती. तसेच काही दिवसांनी बाणेर परिसरातून एका पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी तपासाबाबत सूचना केल्या होत्या. यादरम्यान, पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तपासातून सोनसाखळी चोरीप्रकरणात शफिक शेख याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार पथकाने त्याला पकडले. नंतर मोबाईल चोर फिरोज यालाही तांत्रिक तपासातून बेड्या ठोकल्या. या दोघांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.