Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fahim Khan News : नागपूर हिंसाचारातील कथित मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई सुरू

मागील सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात अनेक भागात जाळपोळ, दगडफेकीच्या घटनाही घडल्या, या हिंसाचारासाठी फहीम खान यानेच ठिणगी टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 24, 2025 | 10:41 AM
Fahim Khan News : नागपूर हिंसाचारातील कथित मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई  सुरू
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर:  मागील सोमवारी (17 मार्च) महाल आणि हंसापुरी येथे झालेल्या दंगल आणि जाळपोळीच्या घटनेचा मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडूनही मोठा फटका  बसणार आहे.   नागपुरातील यशोधरानगरमधील संजयबाग कॉलनीतील त्याच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने त्याला नोटीस जारी  कऱण्यात आली.  या नोटीसीनंतर  आज त्याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशप्रमाणेच नागपुरातही गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडून  फहीम खानच्या घरावर तोडकामाची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तोडकामापूर्वी फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकामे केले होते. हे घर फहीम खानच्या आईच्या नावावर होते.  यासोबतच  EWS योजनेअंतर्गत NITने खान कुटुंबाला ही जागा 30 वर्षांच्या लीजवर दिली होती.  कारवाईपूर्वी  कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे.

Kunal Kamra News: ‘गद्दार नजर वो आये…’; एकनाथ शिंदेंवर टिका करणारा स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत

सरकारचा दंगेखोरांना इशारा, दोन दुकाने सील

हिंसाचारानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी  20 मार्चला फहीम खानच्या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या उल्लंघनाचा अहवाल सादर केला होता.  या घरासाठी कोणताही अधिकृत बांधकाम परवाना मंजूर करण्यात आलेला  नसल्यामुळे हे अनधिकृत बांधकाम असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला होता.  नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शी संबंधित दंगलखोरांनी वापरलेली दोन दुकानांना टाळे लावले.   त्यानंतर आता नागपूर महापालिकेने दोन जेसीबीच्या मदतीने फहीम खानच्या घरावर तोडकाम कारवाई सुरू केली आहे.

सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असून, संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेने 21 मार्च रोजी फहीम खानच्या आईच्या नावावर असलेल्या 86.48 चौरस मीटरच्या बेकायदेशीर घरावर नोटीस बजावली होती. आता ही कारवाई वेगाने सुरू असून, यामधून सरकारने दंगेखोरांना कठोर इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

World Tuberculosis day 2025: मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टीबी किती धोकादायक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बुलडोझर कारवाईचा इशारा दिला होता. ‘हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांना करावी लागेल. त्याची मालमत्ताही जप्त केली जाईल. जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे बुलडोझर चालवला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.’ असा इशारा फडणवीसांनी दिला होता.

Web Title: Bulldozer operation underway at house of alleged mastermind of nagpur violence faheem khan nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
1

Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Nagpur Violence: पोलिसांशी वाद, हल्ल्याच्या ठिकाणी हालचाली…; नागपूर हिंसाचारातील तिसऱ्या आरोपीला अटक
2

Nagpur Violence: पोलिसांशी वाद, हल्ल्याच्या ठिकाणी हालचाली…; नागपूर हिंसाचारातील तिसऱ्या आरोपीला अटक

Nagpur Violence: ‘दोन समाजात तेढ…’; सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिली सक्त ताकीद
3

Nagpur Violence: ‘दोन समाजात तेढ…’; सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिली सक्त ताकीद

Husain Dalwai on Nagpur Violence:  नागपूरच्या हिंसाचारात पहिली चूक पोलिसांची…; हुसेन दलवाईंनी स्पष्टचं सांगितलं
4

Husain Dalwai on Nagpur Violence: नागपूरच्या हिंसाचारात पहिली चूक पोलिसांची…; हुसेन दलवाईंनी स्पष्टचं सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.