Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात सलमान पठाण यांनी काही रकमेची गुंतवणूक केली. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात सलमान पठाण यांनी शेख रियाज याच्या सांगण्यावरून दोन कोटीची गुंतवणूक केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2025 | 09:33 AM
दाम्पत्याला फसवून लुटले

दाम्पत्याला फसवून लुटले

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव : इलेक्ट्रॉनिक्स बाजारात पैसे गुंतवणुकीवर नऊ ते बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला जावई व सासऱ्याच्या जोडीने तब्बल सहा कोटी नऊ लाख ५७ हजार १०३ रूपयांचा गंडा घातला. गंडा घालणाऱ्या जावयाचे नाव शेख रियाज व त्याचे सासरे सय्यद अनिस रझवी (रा. बड़े नवाब बाडा, चेलूपर, ह.मु. युनाईटेट अरब इमिरेटस, दुबई) असे आहे.

या प्रकरणात सलमान लियाकत खां पठाण (वय ३५, रा. वाळुज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सलमान पठाण हे एसएसपी असोसिऐट्स नावाची फर्म चालवतात. त्यांची ओळख गुंतवणूकीच्या संबंधातून शेख रियाज शेख गुलाब रब्बानी (रा. नॅशनल कॉलनी, मौलाना आइसाद कॉलेजसमोर) याच्याशी वर्ष २०१५ मध्ये झाली. शेख रियाज याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो असे सांगितले. शेख रियाजने सुरवातीच्या काही रकमेवर चांगला परतावा देऊन सलमान पठाण यांचा विश्वास संपादन केला.

दरम्यान, कोरोना संकटामुळे शेख रियाज यांना फटका बसला. यानंतर त्याने मार्च २०२२ मध्ये त्याच्या सासऱ्यासोबत दुबई व्यवसाय करण्याचे सांगितले. यासाठी सुप्रिम इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुंतवणूक करण्याचे सांगितले.

आरोपींमध्ये जावयासह सासऱ्याचा समावेश

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात सलमान पठाण यांनी काही रकमेची गुंतवणूक केली. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात सलमान पठाण यांनी शेख रियाज याच्या सांगण्यावरून दोन कोटीची गुंतवणूक केली. तसेच जुलै २०२४ ते जुलै २०२४ या काळात विविध खात्यातून तसेच रोखीने सलमान पठाण यांनी २ कोटी १५ लाख ५० हजार रूपये दिले, या गुंतवणूकीतील एक कोटी १३ लाख १६ हजार ५०० रूपये शेख रियाज याने दिले.

नंतर पैसे देणे झाले बंद

यानंतर शेख रियाज याने पैसे देणे बंद केले. एकूण व्यवहारामध्ये त्यांची ६ कोटी नऊ लाख ५७ हजार १०३ रूपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी गंडा घालणाऱ्या शेख रियाज आणि त्याचा सासरा सय्यद अनिस रझवी या दोघांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यवसायात मंदी झाल्याने करावा लागला बंद

कोरोना काळामुळे शेख रियाज याचा इलेक्ट्रॉनिक्सचा धंदा मंदी आल्याने त्याने बंद केला. सलमान पठाण यांना जाळ्यात अडविण्यासाठी शेख रियाज याने त्याचे सासरे सय्यद अनिस रझवी यांची दुबईत पेपरची आणि सॉफ्टवेअर कंपनी तर दुबईत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असल्याचे सांगितले. सासऱ्यांना चीन, रशिया, सौदी अरेबियात आयफोन पाठविण्याचे ऑर्डर मिळाल्याची थाप त्याने मारली.

Web Title: Businessman cheated by promising high returns on investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
1

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

तलवार, बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याचे दुकान लुटले; तोंड बंद कर नाहीतर…
2

तलवार, बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याचे दुकान लुटले; तोंड बंद कर नाहीतर…

Mira Bhayander : माजी आमदार गीता जैन अडचणीत; मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
3

Mira Bhayander : माजी आमदार गीता जैन अडचणीत; मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने…
4

लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.