Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

तपासात मदत करणे, तसेच जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या मुळशीतील पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 12:30 AM
35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:
  • 35 हजारांची लाच घेणं भोवलं
  • सहायक फौजदाराला रंगेहात पकडले
  • एसीबीची मोठी कारवाई
पुणे : राज्यासह देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याचे अनेक प्रकरणे आत्तापर्यंत उघडकीस आले आहे. एसीबीकडून तीव्र कारवाई करण्यात येत आहे, तरीही घटना कमी होताना दिसून येत नाही. अशातच आता पुणे जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तपासात मदत करणे, तसेच जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या मुळशीतील पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तडजोडीत तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

 

या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४६, रा. ग्रीन फ्लाॅरेन्झा सोसायटी, सूस, ता. मुळशी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गु्न्ह्यात जप्त केलेली गाडी परत करणे, तसेच तपासात मदत करण्यासाठी सहायक फौजदार शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदाराने तडजोडीत ३५ हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर पौड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मुळशी चौकीच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना शिंदे यांना सायंकाळी पकडण्यात आले. रात्री उशीरा पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Web Title: Acb has caught an assistant constable of paud police station while accepting a bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Bribe News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
1

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
2

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
4

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.