Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शिरोलीत चोरीच्या घटना थांबता थांबेना; पंचगंगा नदीवरील केबल चोरट्यांनी नेली चोरून

पंचगंगा नदीवरील या ठिकाणी वारंवार केबल चोरीची व कॉपर पट्ट्यांच्या चोरीचे घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी चोरटे बिनधास्तपणे चोरी करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2025 | 01:19 PM
नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...

नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...

Follow Us
Follow Us:

शिरोली : कृषी पाणी पुरवठा संस्थेच्या कृषी पंपांच्या मोटरच्या केबल, कॉन्ट्रॅक्ट पट्ट्या आदी तांब्याच्या साहित्यांच्या चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी हे साहित्य चोरट्याने चोरून नेऊन धुमाकूळ घातला आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीसांकडून फिर्याद घेण्यास आणि तपासाबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे कृषी सहकारी संस्थांचे आर्थिक नुकसान होत असून, शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासही अडचणी येत असल्याने पीकांचेही नुकसान होत आहे.

हेदेखील वाचा : उद्धव ठाकरेंची टोपलीभर लिंबं तर शिंदेंकडून रेड्याची शिंगं; राजकीय वर्तुळात ‘वर्षा’वरुन रंगलं राजकारण

पुलाची शिरोलीतील शिरोली विकास संस्थेच्या पेटीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन वेळा चोरी केली आहे. यामुळे संस्थेचे ५० हजारांच्या वर नुकसान झाले आहे. याबाबत संस्थेच्या वतीने चोरीची फिर्याद देण्यासाठी संस्थेचा कर्मचारी शिरोली पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांनी टाळाटाळ केली. पण शेवटी चेअरमन सतीश पाटील यांनी चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलिसांना भाग पाडले. अद्यापही याप्रकरणाचा तपास झालेला नाही. त्यामुळे चोरट्याने दुसऱ्यांदा त्याच संस्थेच्या इलेक्ट्रिक साहित्याची पुन्हा चोरी झाली आहे.

पंचगंगा नदीवरील या ठिकाणी वारंवार केबल चोरीची व कॉपर पट्ट्यांच्या चोरीचे घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी चोरटे बिनधास्तपणे चोरी करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. याच प्रकारे पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेच्या केबलच्या तारा व केबलही चोरट्याने चोरून नेल्या आहेत. या संस्थेनेही चोरीची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुन्हा सुमारे पन्नास फूट लांबीची केबल चोरट्याने तोडून चोरून नेली आहे.

यापूर्वीही झाली होती चोरी

यापूर्वी याच ठिकाणाहून वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा बंद करून ट्रान्सफार्मर खाली उतरून त्यातले ऑईल काढून सुमारे दीड लाख रुपयाची कॉपर वायर चोरून नेण्याचा प्रकार घडला होता. याबाबत वीज वितरण कंपनीनेही शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पण त्याचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे समजते.

नवीन लागणीसाठी पाणीपुरवठा सुरू

सध्या तुटलेल्या खोडवा ऊसात आणि नवीन लागणीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. चार दिवस रात्रपाळी चार दिवस दिवसपाळी अशामुळे शेतकरी पाण्याचा मेळ घालत मेटाकुटीला आला आहे. पुराच्या पाण्यामुळे मागील वर्षी येथील ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणातील नुकसान, परत केबल चोरीचे प्रकार घडल्यामुळे पाण्याच्या पुढील पाळीचे नियोजन चुकत आहे.

हेदेखील वाचा : Delhi Assembly Elections : मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या अडचणींमध्ये वाढ; पोलिसांकडून गंभीर आरोप, FIR दाखल

Web Title: Cable on panchganga river stolen by thieves nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Kolhapur Crime
  • Theft Cases

संबंधित बातम्या

Accident News: हातकणंगलेत धनबाद एक्स्प्रेसची धडक; इयरफोन लावून रुळावरून चालणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
1

Accident News: हातकणंगलेत धनबाद एक्स्प्रेसची धडक; इयरफोन लावून रुळावरून चालणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.