आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतिशी मार्लेना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होत असून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाविरोधात भाजप व कॉंग्रेसने देखील दिल्लीसाठी अथक प्रयत्न केले आहेत. उद्या (दि.05) रोजी मतदान पार पडणार असून दिल्लीचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान, आप नेत्या व दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
दिल्लीमध्ये निवडणुकीची धामधुम असताना मतदानाच्या फक्त एक दिवस आधी, दिल्लीच्. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदपुरी पोलिसांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतिशींवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी आतिशींच्या समर्थकांविरुद्ध देखील दुसरा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. निवडणूक आयोगाचे सदस्य बनून त्यांनी रमेश बिधुरी यांच्या पुतण्याचा मार्ग रोखण्याचे काम केले. या प्रकरणांमुळे आप नेत्या आतिशी मार्लेना यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डीसीपी दक्षिण पूर्व दिल्लीच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे की, 04/02/2025 रोजी पहाटे 12.30 वाजता, कालकाजी (एसी-५१) येथील आप उमेदवार 50-70 लोक आणि 10 वाहनांसह फतेह सिंग मार्गावर आढळला. एमसीसीमुळे पोलिसांनी त्यांना घर रिकामे करण्याचे निर्देश दिले. एफएसटीच्या तक्रारीवरून, गोविंदपुरी पोलिस ठाण्यात कलम 223 बीएनएस आणि 126 आरपी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यावर आप नेत्या आतिशी मार्लेना यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
आप नेत्या व दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दिल्ली पोलीस व निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवला आहे. आतिशी यांनी लिहिले आहे की, निवडणूक आयोगही अजब आहे! रमेश बिधुरीजींच्या कुटुंबातील सदस्य उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मी पोलिसांकडे तक्रार केली आणि @ECISVEEP मी त्यांना फोन केला आणि त्यांनी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला! राजीव कुमार जी: तुम्ही निवडणूक प्रक्रिया किती खराब कराल? असा सवाल आतिशी मार्लेना यांनी उपस्थित केला आहे.
चुनाव आयोग भी ग़ज़ब है!
रमेश बिधूड़ी जी के परिवार के सदस्य खुले-आम आचार संहिता का उल्लंघन कर रहे हैं। उन पर कोई एक्शन नहीं।
मैंने शिकायत कर के पुलिस और @ECISVEEP को बुलाया, और इन्होंने मेरे ऊपर केस दर्ज कर दिया!
राजीव कुमार जी: आप चुनावी प्रक्रिया कि कितनी धज्जियां उड़ायेंगे https://t.co/UlRiBzbELV
— Atishi (@AtishiAAP) February 4, 2025