Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मोठी बातमी! शिरूरमध्ये आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल; कारण वाचून म्हणाल…

२०२३ मध्ये कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर गरुड यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली,

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2025 | 07:52 PM
Crime News: मोठी बातमी! शिरूरमध्ये आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल; कारण वाचून म्हणाल…
Follow Us
Follow Us:

१. शिरूरमध्ये माजी आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल
२.
कर्ज कर्जदाराला न देता संगनमताने अपहार केल्याचा आरोप 
३. पोलिसांनी दाखल केला गुन्हा

शिक्रापूर:
 शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर गहाण ठेवून मंजूर झालेले कर्ज कर्जदाराला न देता संगनमताने अपहार केल्याप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सचिन बाळासाहेब गरुड  (रा. गणेगाव दुमाला ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला येथील सचिन बाळासाहेब गरुड यांनी व्यवसाय विस्तारासाठी २०१९ मध्ये अजित मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड येथे कर्जासाठी अर्ज केला होता. या संस्थांनी त्यांची शेतीजमीन गहाण ठेवून आवश्यक कागदपत्रे घेतली. दरम्यान, वेळोवेळी टाळाटाळ करत असताना दोन्ही संस्थांकडून एकूण ६५ लाखांचे कर्ज मंजूर करून जमिनीवर बोजा टाकण्यात आला. मात्र, मंजूर झालेले कर्ज कर्जदाराला न देता संबंधित संस्थांचे संस्थापक, संचालक व व्यवस्थापक यांनी संगनमताने ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचा आरोप आहे.

जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर फसवणुकीचा उलगडा

२०२३ मध्ये कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर गरुड यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिरुर पोलिसांना संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार  माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत.

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला

पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय तरुणासोबत घडली. तेथील तीन महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. फिर्यादी तरुण एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलांना (वय ३२, रा. दत्तवाडी) हिच्याशी व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करायचे होते, मात्र पासवर्ड विसरल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून वाद झाला आणि मारहाण झाली.

Web Title: Case registered against former mla ashok tekwade in shirur crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • crime news
  • Shirur Crime
  • Shirur Police

संबंधित बातम्या

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…
1

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा
2

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
3

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!
4

Harry Boxer Arrested: रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा गँगस्टर हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.