Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या महिन्याभराच्या बाळाच्या कथित खरेदी-विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईची परिस्थिती हेरून माय-लेकीने बाळ घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप असून, आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 25, 2026 | 05:40 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Follow Us
Follow Us:
  • अवघ्या महिन्याच्या बाळाचा ₹१.२० लाखांत व्यवहार केल्याचा आरोप
  • बाळ परत न मिळाल्याने जन्मदात्या आईने पोलिसांत केली तक्रार
  • माय-लेकीला अटक; इतर संबंधितांची भूमिका तपासात
 

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरात अवघ्या महिन्याभराच्या बाळाच्या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. बाळाच्या जन्मदात्या आई-वडिलांना पैसे देऊन त्यांच्याकडून बाळ घेतल्याचा आरोप दोन महिलांवर करण्यात आला आहे. आईने बाळ परत मागितल्यानंतरही ते न मिळाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि तपासातून कथित व्यवहाराची माहिती समोर आली.

रुग्णालयातील ओळखीतून सुरुवात

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित ३६ वर्षीय महिला काही वर्षांपासून मुंबईत राहत होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती एका पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. ५ जुलै रोजी तिने घाटी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. याच काळात तिची संजयनगर परिसरातील ६५ वर्षीय कौशल्या बारकू पवार यांच्याशी ओळख झाली. कौशल्या स्वयंपाकाचे काम करत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Crime News: मोबाईलमधील डिलीट डेटा ठरला महत्त्वाचा; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा

परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप

तक्रारीनुसार, कौशल्या यांनी बाळाच्या आईच्या कौटुंबिक परिस्थितीचा उल्लेख करत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बाळाचा सांभाळ कसा होईल, याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी आपली मुलगी सीमा बाळाला सांभाळण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. सुरुवातीला आईने बाळ देण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर तिची आणि बाळाच्या वडिलांची समजूत काढण्यात आली.

₹१.२० लाखांचा कथित व्यवहार

पोलिसांच्या तपासानुसार, ८ ऑगस्ट रोजी सीमा अनिल रेशवाल हिने ₹१ लाख २० हजार रुपये रोख दिल्याचा आरोप आहे. तसेच बॉण्ड पेपरवर बाळ देण्याबाबतचा व्यवहार लिहून घेतल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे बाळाचा ताबा जन्मदात्या आई-वडिलांकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला. मात्र, काही दिवसांनी आईला आपल्या मुलाची आठवण येऊ लागली आणि तिने बाळ परत मागण्यास सुरुवात केली.

‘बाळ उद्या आणून देते’ म्हणत टाळाटाळ

आईने बाळ परत देण्याची विनंती केल्यानंतर सीमा रेशवाल हिने बाळ सध्या तिच्याकडे नसल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. बाळ नातेवाईकांकडे असल्याचे सांगून वेळ मारून नेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. वारंवार विनंती करूनही बाळ परत मिळत नसल्याने अखेर आईने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

हेही वाचा: Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

पोलिसांच्या तपासात व्यवहार समोर

पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार अशोक कचरे आणि अंमलदार राजाभाऊ कोल्हे यांनी तपास केला. तपासादरम्यान बाळाच्या कथित खरेदी-विक्रीचा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सीमा रेशवाल हिच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

माय-लेकीला अटक

या प्रकरणी २४ सप्टेंबर रोजी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर सीमा अनिल रेशवाल आणि तिची आई कौशल्या बारकू पवार यांना पोलिसांनी अटक केली. दोघींना न्यायालयात हजर केल्यानंतर कौशल्या पवार आणि सीमा रेशवाल यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, बाळाची सध्या कोणत्या परिस्थितीत देखभाल केली जात आहे, कथित व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि पैशांचा व्यवहार नेमका कसा झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar baby sale case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news
  • maharashtra crime cases

संबंधित बातम्या

Sambhajinagar CCTV Rules : संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना CCTV  बंधनकारक ! ५० मीटर परिसरावर पोलिसांची नजर
1

Sambhajinagar CCTV Rules : संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक ! ५० मीटर परिसरावर पोलिसांची नजर

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…
2

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा
3

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
4

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.