Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar CCTV Rules : संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक ! ५० मीटर परिसरावर पोलिसांची नजर

Sambhajinagar CCTV Rules : छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व खासगी आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 08, 2026 | 03:59 PM
Chhatrapati Sambhajinagar CCTV Rules ( छत्रपती संभाजीनगर सीसीटीव्ही नियम ) फोटो सौजन्य AI

Chhatrapati Sambhajinagar CCTV Rules ( छत्रपती संभाजीनगर सीसीटीव्ही नियम ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी हा निर्णय घेतला  
  • फुटेजची प्रत देणे बंधनकारक  
  • उल्लंघन केल्यास कारवाई 
 Sambhajinagar CCTV Rules : छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार प्रत्येक आस्थापनाच्या सीमारेषेपासून ५० मीटरपर्यंतचा परिसर कॅमेऱ्यांच्या नजरेत येणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवून किमान १५ दिवसांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवावे लागणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी हा निर्णय घेतला

शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. ६ नोव्हेंबरपासून ४ जानेवारी २०२७ पर्यंत ६० दिवसांसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. बँका, एटीएम, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोल पंप, ज्वेलर्स, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे, जिम, चित्र पटगृहे, टॉवर्स आणि कार्यालयीन इमारतींसह सर्व खासगी आस्थापनांना या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ? भगदाडांतून गुन्हेगारांची एन्ट्री

फुटेजची प्रत देणे बंधनकारक

सीसीटीव्ही यंत्रणेत किमान १५ दिवसांचे फुटेज सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्लेबॅक आणि फुटेज कॉपी करण्याची सुविधाही उपलब्ध ठेवावी लागणार आहे. परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी मागणी केल्यास संबंधित फुटेज उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई

पोलिस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित खासगी आस्थापनांनी निर्धारित निकषांनुसार सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nagpur News : फलाटांवर नरकयातना घेऊन आली दिवाळी; नागपूरहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

Web Title: Sambhajinagar cctv cameras mandatory private establishments sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • CCTV
  • cctv cameras
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Bengaluru Family Murder Case : सात नातेवाईकांच्या हत्येत अल्पवयीन मुलीची भूमिका संशयास्पद; वडिलांसोबत कटात सहभागी असल्याचा आरोप
1

Bengaluru Family Murder Case : सात नातेवाईकांच्या हत्येत अल्पवयीन मुलीची भूमिका संशयास्पद; वडिलांसोबत कटात सहभागी असल्याचा आरोप

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!
2

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.