Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…

मध्यरात्री गस्त घालताना पोलिसांनी काही तरुण-तरुणींना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच पुन्हा त्याच टोळक्याशी सामना झाला आणि परिस्थिती चिघळली. ‘याला जिवंत सोडू नका’, अशी चिथावणी देत पोलिसाला पकडून ठेवल्याचा आणि तरुणीने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं करोडीतील आंबेडकर चौकात?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 09, 2026 | 03:39 PM
छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्...

छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्...

Follow Us
Follow Us:
  • करोडीतील आंबेडकर चौकात मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदारावर हल्ला.
  • तरुणीने चाकूने वार केल्याचा आरोप; फकिरा तडवी जखमी.
  • तीन तरुणींसह आठ जणांवर गुन्हा; एकाला घटनास्थळावरून अटक.
 

छत्रपती संभाजीनगर : रात्रीच्या वेळी विनाकारण थांबून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणींना तेथून जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून टोळक्याने पोलीस अंमलदारावर हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील करोडी परिसरात घडली. आंबेडकर चौकात मध्यरात्री घडलेल्या या प्रकारात एका तरुणीने चाकूने वार केल्याचा आरोप आहे. फकिरा नब्बास तडवी (वय ३७) असे जखमी पोलीस अंमलदाराचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी तीन तरुणींसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर संजय इंगळे याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. शाहरुख ऊर्फ जावेद, रोहिणी सुभाष बेळगे, अश्विनी सुभाष बेळगे, सागर संजय इंगळे, अभी गायकवाड आणि रोहित चव्हाण (सर्व रा. कमळापूर, रांजणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्य दोघांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

रात्री गस्त घालताना तरुण-तरुणी आढळले

फकिरा तडवी हे दौलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ७ ऑक्टोबरच्या रात्री ते पोलीस अंमलदार गाडे आणि होमगार्ड नईम यांच्यासोबत डायल ११२ च्या वाहनातून गस्त घालत होते. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भांगसीमाता गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या पटांगणात तीन महिला आणि पाच पुरुष बसलेले त्यांना आढळले. पोलिसांनी त्यांना रात्रीच्या वेळी तेथे थांबण्याचे कारण विचारले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर गस्ती पथक पुढे गेले.

हेही वाचा: Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

‘चोर असल्याची’ माहिती मिळताच पथक पुन्हा पोहोचले

रात्री सुमारे १ वाजून १० मिनिटांनी करोडी गावातील आंबेडकर चौकात चोर असल्याची माहिती एका प्रवाशाने गस्ती पथकाला दिली. त्यानुसार तडवी आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा यापूर्वी पटांगणात आढळलेले तेच आठ जण तेथे गोंधळ घालत असल्याचे दिसले. पोलिसांनी पुन्हा त्यांना थांबवून नावे विचारली आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. यावरून संबंधितांनी पोलिसांना शिवीगाळ सुरू केली आणि त्यांच्यावर हल्ला चढवल्याचा आरोप आहे.

पोलिसाला पकडून ठेवत हल्ला केल्याचा आरोप

हल्ल्यादरम्यान, ‘याला जिवंत सोडू नका’, अशी चिथावणी देत काही जणांनी पोलीस अंमलदाराला पकडून ठेवल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी एका तरुणीने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फकिरा तडवी जखमी झाले. थेट पोलीस अंमलदारावरच हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar police constable knife attack karodi sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • chhatrpati sambhaji nagar
  • Knife attack

संबंधित बातम्या

Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत
1

Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.