
Five Women Rescued from Hotel, Three Arrested ( हॉटेलमधून पाच महिलांची सुटका; तिघांना अटक ) फोटो सौजन्य AI
या कारवाईत दोन बांगलादेशी आणि पश्चिम बंगालमधील तीन अशा पाच महिलांची सुटका करण्यात आली. या व्यवसायात सहभागी असल्याच्या आरोपावरून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, हटिल चालकासह अन्य एका संशयिताचा शोध सुरू आहे. पोलिसांनी ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २० नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाला करोडी शिवारातील हॉटेल निसर्ग येथे अवैधरीत्या कुंटणखाना चालविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे नियोजन केले, पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला १२०० रुपये देऊन हॉटेलमध्ये पाठविले. त्याने हॉटलमध्ये प्रवेश केल्यानंतर मोबाईलद्वारे ठरलेला इशारा केल्ला. हा इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने हटिलवर छापा टाकला.
या कारवाईत हॉटेलचा मॅनेजर आदित्य सुशीलकुमार पांडे, लॉजिंगची व्यवस्था पाहणारा रवी काशिनाथ पोळ आणि संजय बन्सी जाधव या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हॅाटेलमधून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच देहव्यापारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणी आढळलेल्या दोन ग्राहकांचीही पोलिसांनी चौकशी केली.
सुटका करण्यात आलेल्या महिलांची चौकशी केली असता, त्यांना लॉज चालक कमलेश भालेराव (रा. तीसगाव) आणि देवीदास मुन्शी राठोड (रा. बीदर) यांनी येथे आणल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांच्या तक्रारीवरून आदित्य पांडे (रा. उत्तर प्रदेश), रवी पोळ (रा. ठाणे), संजय जाधव (रा. . बीड), कमलेश भालेराव आणि देवीदास राठोड . अशा पाच जणांविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिस चौकशीदरम्यान पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, देहव्यापारासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून लॉज चालक व त्याचे साथीदार १२०० रुपये घेत होते. त्यापैकी महिलांना केवळ ५०० रुपये दिले जात होते. सुटका करण्यात आलेल्या पाच महिलांमध्ये दोन बांगलादेशी आणि पश्चिम बंगालमधील तीन महिलांचा समावेश असल्याची माहितीही महिलांनी पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास दौलताबाद पोलिस करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, मनोज अकोले, – शैलेश आस्कर, दिनेश राठोड, वाडीलाल – जाधव, विशाल सोनवणे तसेच विशेष पथकातील वैष्णवी जटाळे, पूजा इंगळे आणि – पूजा भोसले यांनी केली.