Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

गंगापूर (वा) डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात नागरिकांनी सजग राहावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 08:27 PM
Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम;
  • सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन
छ. संभाजीनगर :   गंगापूर (वा) डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात नागरिकांनी सजग राहावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केले आहे. नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बजाज फायनान्स लिमिटेड (बिएफएल) यांच्यावतीने ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बजाज फायनान्स लिमिटेडच्या माध्यमातून हा उपक्रम देशातील १०० शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. डिजिटल युगातील विविध सायबर धोके, त्यापासून बचावाचे उपाय आणि आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

बनावट संस्थांच्या माध्यमातून फसवणूक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२४ मध्ये एनबीएफसीसाठी जारी केलेल्या फसवणूक जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात बनावट सोशल मीडिया खाती, व्हॉट्सअॅप गट, बनावट आर्थिक संस्था आणि त्यांच्या संकेतस्थळांद्वारे कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यानी नागरिकांना “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” असा संदेश देत अज्ञात लिंक, कॉल किया संदेशांची खातरजमा केल्याशिवाय प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन केले.

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

तत्काळ तक्रार हेच सायबर गुन्ह्यांविरुद्धचे प्रभावी शस्त्र

नागरिकांशी संवाद साधताना सायबर फसवणूक ही वाढती सामाजिक समस्या आहे. निष्काळजीपणे वैयक्तिक माहिती शेअर केल्यास ती गुन्हेगारांच्या हातात जाते. फसवणूक झाल्याची जाणीव होताच त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या ६० मिनिटांना ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते आणि या काळात तक्रार नोंदवल्यास सुमारे ९० टक्के रक्कम परत मिळण्याची शक्यता असते ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता ही संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असून ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांतून सातत्याने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जात असल्याचे बजाज फायनान्सच्या प्रतिनिधींनी सांगितले.

डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी आणि तत्काळ तक्रार नोंदविणे हेच सायबर गुन्ह्यांविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला हेड कॉन्स्टेबल खाडे, दीपक ठोंबरे, अमोल एष्टके, निवृत्त उपअधीक्षक भारत काकडे यांसह सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

Web Title: Chhtrapti sambhajinagarknockout digital fraud awareness campaign only alert citizens can prevent digital fraud appeals police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या
1

बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”
2

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह
3

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण
4

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.