Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 06:22 PM
बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:
  • बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न
  • लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या
  • दहा जणांवर गुन्हा दाखल
वडगाव मावळ/ सतिश गाडे : पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मावळ तालुक्यात जमिनींचे दर झपाट्याने वाढल्याने जमीन व्यवहारांमध्ये गैरप्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

 

या प्रकरणी हर्ष प्रविणचंद्र परमार (वय ४२, रा. गुलालवाडी, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, एकनाथ शंकर जांभुळकर, शैलेश सुरेश ओव्हाळ, शंकर भागोजी ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, बुवा उर्फ गुलाब जाधव, ऋषिकेश ओव्हाळ (सर्व रा. कुरवंडे, ता. मावळ), गौतम सपकाळ (रा. खंडाळा, ता. मावळ), नासिर आरकटी (रा. लोणावळा), शेखर पाटील व एक अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्ष परमार यांचे वडील प्रवीणचंद्र परमार यांनी मावळ तालुक्यातील कुरवंडे येथे जमीन खरेदी केली होती. वडिलांच्या निधनानंतर काही व्यक्तींनी संगनमताने जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून गट क्रमांक २६७ या जागेचे बनावट खरेदीखत तयार केले. संबंधित दस्तऐवजावर खोट्या सह्या करून नोंदणी कार्यालयात शुल्क भरल्याचे भासविण्यात आले. चलनाद्वारे फी भरल्याचे दाखवून दस्तऐवज वैध असल्याचा आभास निर्माण करून जमीन स्वतःच्या नावावर नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

इतर आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणी पोलिसांनी एकनाथ जांभुळकर, शैलेश ओव्हाळ, ऋषिकेश ओव्हाळ, गौतम सपकाळ व नासिर आरकटी यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत. पोलिसांकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी, स्वाक्षरी तज्ज्ञांमार्फत परीक्षण तसेच नोंदणी कार्यालयातील नोंदींची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Police have arrested those trying to register a purchase deed using fake documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Froud News

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Twisha Sharma Case मध्ये ट्विस्ट; पती समर्थ सिंगबाबत कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश
2

Twisha Sharma Case मध्ये ट्विस्ट; पती समर्थ सिंगबाबत कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट, लातुरातील तिसरा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर; कसून तपास सुरु
3

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट, लातुरातील तिसरा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर; कसून तपास सुरु

Mira Bhayander Crime : मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती; मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर
4

Mira Bhayander Crime : मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती; मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.