काय घडलं नेमकं?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावात सुखप्रीत कौर (वय 8) या चिमुकलीचा मृत्यू झाला. नंतर पंधरा दिवसांनंतर शुक्रवारी ६ वर्षीय फतेहवीरचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या अचानक मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. दोन्ही मुलांचे मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे आईने सांगितले. या दोन्ही मुलांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी शनिवारी सकाळी फुल पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीची मागणी केली. त्यांनतर पोलिसांचे एक पथक गावात आले आणि त्यांनी आरोपी आई जस्सी गौरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार
पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली असता सुरुवातीला तिने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
या कटात जस्सी कौरची बहीण मोटो कौर आणि एक पुरुष लक्खी सिंग हे देखील सहभागी होते. मुलांच्या हत्येमागे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले गेले. या प्रकरणात आईसह मावशीला देखील अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
धक्कादायक! शेतात शौचासाठी गेला अन् …, बाप-लेकाने केली तरुणाची क्रूर हत्या, आरोपी अद्याप फरार
पंजाब येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतातील ऊस उपटल्याच्या खोट्या आरोपावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची समोर आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गोरा सिंह (27) असे आहे. तो पंजाबमधील लहिरा सौंधा गावाचा रहिवासी होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी, गोरा सिंह आपल्या वडिलांसोबत पायी जात असताना वाटेत शौचासाठी शेताच्या कडेला थांबला होता. त्याच वेळी शेतमालक कुलदीप सिंह आणि त्याचा मुलगा तिथे पोहोचले. त्यांनी गोरा सिंहवर शेतातील ऊस उपटल्याचा खोटा आरोप केला. सुखदेव सिंह आणि त्यांच्या मुलाने आम्ही ऊस तोडला नसून केवळ शौचासाठी इथे आलो आहोत, असे वारंवार सांगितले. आरोपींनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट आरोपींनी शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेतला. या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले. बाप- लेकाने मिळून गोरा सिंहला लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण एव्हडी भयंकर होती की तो गंभीर जखमी झाली आहे. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह
Ans: उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोप आहे.
Ans: १५ दिवसांत दोन मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला.
Ans: आईचा कबुलीजबाब घेत अटक केली आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे.






