Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट: मुख्यमंत्री फडणीसांची सभागृहात मोठी घोषणा

बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 20, 2024 | 03:26 PM
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट: मुख्यमंत्री फडणीसांची सभागृहात मोठी घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.

Devendra Fadnavis: “भास्कर जाधव नागरिकशास्त्राच्या तासाला …”; मुख्यमंत्री फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

फडणवीस म्हणाले, “ आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. यातून काहींना रोजगार मिळतो, पण आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या, असाही प्रकार उघडकीस आला आहे. 6 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर हल्ला केला. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅम अमरदिप सोनावणेला मारहाण केलीय त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटेलाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर वॉचमॅननं सरपंट संतोष देशमुखांना दिली.

वॉचमॅनकडून माहिती मिळताच सरपंचआणि काही जण त्याठिकाणी पोहटले. आपल्या माणसांना दुसऱ्या गावातील काही लोक मारहाण करत असल्याचे पाहून त्यांनी मारेकरऱ्यांना हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यातच मारामारी झाली.9 डिसेंबरला संतोष देशमुख देशमुख गावी परत जाण्यासाठी निघाले होते. ते एकटेच असताना वाटेत त्यांनी आतेभाऊ भेटले आणि  त्यांना सोबत घेऊन निघाले.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

पण टोल नाक्याजवळ एक काळ्या रंगाची गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर त्यांनी देशमुखांची गाडी अडवली. काचफोडून त्यांनी त्यांना गाडीबाहेर काढले आणि काळ्या रंगाच्या गाडीत घालून त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणात त्यांना काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणातला मास्टरमांईड कुणीही असला तरी त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरिक्षक पातळीवर एसआयटी स्थापन केली जाईल, याशिवाय न्यायालयीन चौकशीचीही केली जाणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं. याशिवाय बीडच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांचीही बगली होणार असल्याचे फडणवीसांनी नमुद केल आहे.

दरम्यान, याप्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख  हत्या प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल किंवा त्याच्या  एन्काऊंटर करेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस  दिले जाईल. इतके नव्हे तर त्याला पाच एकर जमीनही देण्यात येईल. तसेच जो अधिकारी देशमुखांच्या  आरोपीला  लवकरात लवकर अटक करेल त्यांना दोन लाख रूपये रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा माढ्यातील शेतकऱ्याने केली आहे.

 

Web Title: Chief minister fadnis makes a big announcement in the house regarding santosh deshmukh case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Santosh Deshmukh Case
  • Winter Session

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त
1

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…
2

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
3

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”
4

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.