परभणीत दोन गटात राडा; लाठ्याकाठ्यांनी केली गेली मारहाण, कारण आलं समोर...
परभणी : परभणीत दोन गटांत वाद झाल्याचे समोर आले. दोन गटांमध्ये असलेला वाद आता उफाळून आला असून, दोन्ही गट आमनेसामने आले होते. यानंतर एकमेकांना लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यात आठ जण जखमी झाले असून, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिंतूर शहरात ही घडली. यातील जखमींना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील कुरेशी मोहल्ला येथे घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात दोन गटात वाद होता. या आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एकमेकांना लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली गेली. एकमेकांवर असलेल्या रागातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.
हेदेखील वाचा : निक्की हत्याकांड प्रकरणात नवीन खुलासा, घटनेच्या वेळी विपिन घरी नव्हता का? व्हायरल व्हिडिओमुळे हत्येचे गूढ गुंतागुंतीचे
दरम्यान, दोन्ही गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत आठ ते दहाजण जखमी झाले आहेत. यातील दोन जणांना डोक्यात मार असल्याने गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.
नागरिकांची रुग्णालयाबाहेर गर्दी
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. तर घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये दोन गट आक्रमक झाले होते. त्यानंतर परभणीत घटना घडली.
पिंपरीत टोळक्याचा राडा
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे प्रकार घडत आहेत. असे असताना आता दुसऱ्या एका घटनेत, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काळेवाडीच्या जीवन चौकात सात जणांच्या टोळक्याने राडा घातला. या टोळक्याने दहशत निर्माण करत दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला केला.