Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं; मध्यरात्री जाधववाडीत खळबळ

छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी परिसरात मध्यरात्री पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. आरोपींनी मारहाण करून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आणि मोबाईल हिसकावून २० हजारांची खंडणी मागितली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 05:24 PM
मदतीसाठी गेलेल्या 'त्या' नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या 'त्या' नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Follow Us
Follow Us:

 

  • पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं
  • मध्यरात्री जाधववाडीत खळबळ
Chhatrapati Sambhajinagar Crime: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणाना चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली, जबरदस्तीने त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यात आले. त्यांचे मोबाईल हिसकावून घेत, जबरदस्ती ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम काढण्यात आली. या प्रकारामुळे शहरातील तरुणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, हा प्रकार 28 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.15 वाजेच्या सुमारास जाधववाडी भाजी मंडी परिसरात घडली. प्रकरणात निखिल विजय बुरकुल (19, रा. चिखली जि. बुलडाणा, ह.मु. पवननगर, एन-11 हडको) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी बुरकुल हा मिञ अनिकेत थुट्टे व प्रसाद शिंगणे यांच्यासोबत जाधववाडी भाजी मंडी परिसरात राईस खाण्यासाठी गेला होता. ते तिघे एका दुकानाजवळ बसलेले असताना एका स्कुटीवर तीन तेथे आले. त्यांनी तुम्ही दुकानाचे शटर फोडत आहात का? असा संशय व्यक्त करत तिघांना बाजूच्या इमारतीच्या छतावर नेले. आरोपींनी तिघांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले, प्रसाद शिंगणे व बुरकुल या दोघांना मारहाण करण्यात आली, तर अनिकेत थुट्टे याच्या पोटाला चाकू लावून, चाकू धारदार आहे का, असे म्हणत चाकूला हात लावण्यास सांगण्यात आला. या सर्व प्रकारामुळे तरुण पूर्णतः घाबरले. आरोपींपैकी एकाने निखिल बुरकुल याचा मोबाईल घेऊन जबरदस्ती फोन पे चा पासवर्ड घेतला. त्यानंतर फोन पे अॅपद्वारे 1400 रुपये एका महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर केले.

Sanjay Shirsat: “माणूस हरला आणि खुर्ची जिंकली…”, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका; राजकारणात खळबळ

खोटा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

चाकूचा धाक दाखवत तुम्ही दुकान फोडत होता असे जबरदस्तीने कबूल करायला लावून आरोपींनी तिघांचा व्हिडिओ तयार केला. पुढे याच व्हिडिओच्या आधारे प्रत्येकी 5000 रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी निखिलचा आणि अनिकेतचा मोबाईल हिसकावून घेतला. व दुपारी बस डेपो परिसरात 20 हजार रुपये घेऊन या, तुम्हाला तुमचे मोबाईल परत देवू. पैसे न आणल्यास थेट अकॅडमीत येऊन उचलून नेऊन मारुन टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

तब्बल ३९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास

या घटनेत आरोपीनी रोख रक्कम, ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे पैसे तसेच दोन महागडे मोबाईल फोन असा एकूण 39 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटला, सार्वजनिक ठिकाणी, मध्यरात्री इतक्या निर्भीडपणे घडलेली ही घटना शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंतेची बाब ठरत आहे. या संपूर्ण घटनेमुळे भयभित झालेल्या निखिल बुरकुल याने सिडको पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मंगेश पवार करीत आहेत.

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

Web Title: Young men preparing for police recruitment were robbed at knifepoint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Police bharati

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.