Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस आलं. अमेरिकन नागरिक जेम्स वॉटसनसह तिघे गरीब व वनवासी बांधवांना पैशाचे आमिष देऊन धर्मांतर करत होते. बजरंग दलाच्या सतर्कतेने कट उधळला. पोलिसांनी तिघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 05, 2025 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

भिवंडी येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैश्याचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. गरीब आणि वनवासी बांधवांना टार्गेट करून त्यांना पैश्याचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आले आहे. हा मोठा कट बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच हा कट उधळला.याप्रकरणी पोलिसांनी एका अमेरिकन नागरिकांसह एकूण ३ जणांना अटक केली आहे.

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

नेमकं काय आहे प्रकार?

धर्मांतराचे काम करणारा जेम्स वॉटसन (James Watson) हा अमेरिकन नागरिक त्याच्या स्थानिक साथीदारांना सोबत घेऊन अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. हि माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते संदीप भगत आणि दादा गोसावी यांनी स्थानिक पोलिस पाटलांच्या मदतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी धाव घेतली. भु

ईशेत गावात मनोज गोविंद कोल्हा यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हा प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोपी हिंदू धर्मातील देवी-देवतांवर आणि रुढी-परंपरांवर टीका करत होते. तसेच, मंतरलेले तेल लावल्यास आणि येशूची प्रार्थना केल्यास आजार बरे होतात, अशी बतावणी करून गोरगरीब वनवासी बांधवांना धर्मांतरासाठी आमिष दाखवले जात असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. आरोपींकडे ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणावर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. हा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील भुईशेत, चिंबी पाडा या ठिकाणी घडला आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ गणपती सर्पे, ठाणे (पश्चिम) येथील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारा 58 वर्षीय जेम्स वॉटसन (मूळ अमेरिकेचा नागरिक) आणि मनोज गोविंद कोल्हा हे गावात महिला, पुरुष आणि मुलांना प्रार्थना करण्यासाठी, धार्मिक पुस्तकांमधून वाचन करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी एकत्र करत होते. तो सन 2016 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आला आणि नंतर बिझनेस व्हिसा मिळवून भारतातच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये धर्मांतराचे काम करत होता. कोणताही अधिकृत व्यवसाय न करता तो अनेक वर्षांपासून हे काम करत होता, असा आरोप संदीप भगत यांनी केला आहे.

गुन्हा दाखल

स्थानिक रहिवासी रविनाथ सावजी भुरकुट यांनी हिंदुत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली. घटनेची खात्री झाल्यावर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत घटनास्थळावरून तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध महाराष्ट्र मानवी बलिदान आणि इतर अमानवी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि निर्मूलन कायदा आणि परदेशी कायदा यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

 

Web Title: Conversion racket exposed in bhiwandi american citizen was baptizing minor girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Bhiwandi Crime
  • crime
  • thane

संबंधित बातम्या

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार
1

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा महिलेला अश्लील स्पर्श; व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने घेतली तातडीने कारवाई
2

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा महिलेला अश्लील स्पर्श; व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने घेतली तातडीने कारवाई

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
3

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
4

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.