हरियाणाच्या गुरुग्राम येथे एका शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, शुक्रवारी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याचे समोर आले आहे. प्रकरणातील आरोपी जिम ट्रेनर असून ते झुंबा डान्सचं देखील ट्रेनिंग देत असल्याची माहिती पीडित महिलेनं दिली.
ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयचा महिलेला अश्लील स्पर्श; व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने घेतली तातडीने कारवाई
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात पीडित शिक्षिकेची गौरव नावाच्या तरुणासोबत एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर, 1 ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा आरोपीने पीडितेला फोन करून तिला आपल्या मित्राच्या घरी बोलवलं. त्या खोलीत आधी कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र, काही वेळानंतर आरोपीने आपल्या इतर मित्रांना सुद्धा तिथे बोलवलं.
मित्रांनी केला बलात्कार
तक्रार देतांना पीडितेने सांगितलं की गौरव महिलेला त्याच्या मित्राच्या खोलीत घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. यांनतर, आरोपीने त्याच्या नीरज नावाच्या मित्राने सुद्धा फोन करून बोलावून घेतलं आणि नीरजने सुद्धा पीडित महिलेवर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, गौरव आणि निरांजने त्यांच्या अभिषेक आणि योगेश नावाच्यामित्रांना सुद्धा खोलीत बोलावलं आणि त्या दोघांनी सुद्धा मिळून पीडितेवर बलात्कार केला आहे.
घटनास्थळावरून फरार
त्यानंतर सामूहिक अत्याचार करून तिला घटनास्थळीच सोडून आरोपी फरार झाले. दुसऱ्या दिवशी, २ ऑक्टोबरला पीडित तिच्या घरी पोहोचली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकरासोबत कुटुंबियांना सांगितलं. त्यांनतर पीडितेने महिलेने २ ऑक्टोबर रोजी महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रकरणातील आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून आरोपींविरोधात लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मारेकरी पकडा’ म्हणणारीच निघाली खुनी, सुनेनेच सासऱ्याला संपवलं
हरियाणातील यमुनानगर येथे ओमप्रकाश यांचा त्यांच्या वाड्यात गळा चिरून खून करण्यात आला. तपासात उघड झाले की, ओमप्रकाश यांची सून ललिताचे करतार नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. ओमप्रकाश यांनी हे उघड केल्याची भीती असल्याने ललिताने प्रियकरासह त्यांची हत्या केली. घटनेनंतर तीच सर्वाधिक शोक व्यक्त करत होती. या कुटुंबात २५ दिवसांत ही दुसरी हत्या असून, नातवाच्या मृत्यू प्रकरणातही ललितावर संशय आहे. पोलिसांनी ललिता आणि करतारला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. अवैध संबंधांमुळे वाढणारी गुन्हेगारी ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.
नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला