Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बनावट कागदपत्र काढून त्याद्वारे पारपत्र मिळवून लंडनला गेलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळला पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 01:19 PM
न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

Follow Us
Follow Us:
  • गुंड निलेश घायवळला मोठा दणका
  • न्यायालयाकडून फरार घोषित
  • मालमत्ता जप्त होणार?
पुणे : पुण्यातील कोथरुडमध्ये गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. गुंड निलेश घायवळ टोळीनेही कोथरुड भागात अनेक गुन्हे केले आहेत. अशातच आता निलेश घायवळला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बनावट कागदपत्र काढून त्याद्वारे पारपत्र मिळवून लंडनला गेलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळला पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांना हा निकाल दिला आहे.

कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गोळीबार प्रकरणात घायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. परदेशात गेलेल्या घायवळने ९० दिवसांचा व्हिस्सा मिळवला आहे. याबाबत ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून, घायवळ व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी घायवळला फरार घोषित करण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. पोलिसांचा अर्ज मंजूर झाल्याने आता त्याच्या प्रत्यर्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल.

‘ब्लू कॉर्नर’ नोटीस बजावली

घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला ‘लूक आउट नोटीस बजाविली होती. त्यानंतर ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजाविण्यात आली होती. तर नुकतीच पुणे पोलिसांनी ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस देखील बजावली आहे. घायवळ मूळचा अहिल्यानगरमधील जामखेडचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नीलेश घायवळने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने घेतलेल्या सिमकार्डचा वापर केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढून प्रशासनाची फसवणूक करण्यासह इतर गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने घायवळला फरारी घोषित केले आहे. या निर्णयामुळे त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. – संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन.

तीन गुन्ह्यात दोषारोपपत्र

गोळीबार प्रकरणानंतर निलेश गायवळ याच्यावर वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान यातील दुसऱ्याच्या नावे सिम कार्ड वापरल्या प्रकरणी, बनावट नंबर प्लेट गाडी वापरणे व घरात काडतुसे सापडल्याप्रकरणी या तीन गुन्ह्यात पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Web Title: Court declares gangster nilesh ghaywal absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Nilesh Ghaywal
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
1

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…
3

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…
4

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.