Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (१९ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर शहरात आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2026 | 02:26 PM
‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये भरपाई द्या
  • खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
  • ५ हजारांची मदत अपुरी असल्याची टीका
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी आपत्तींनी त्रासलेला असताना सरकारने त्यांना पुरेसा आधार देण्याची गरज होती. असे असतानाही सरकारने केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तीही अद्याप मिळाली नाही. इतकेच नव्हे तर नमो योजनेचे कित्येक शेतकऱ्यांचे सहा हजार रुपयांचे दोन- दोन हप्ते थकीत आहेत. दोन्ही मदती तत्काळ द्याव्यात, हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त प्रचारार्थ त्या सोमवारी (१९ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर शहरात आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात सुरु असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे ही व इतर सर्व निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आजघडीला जनतेला आधार देण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होऊही ते होल्ड करून ठेवले जात आहे. चारा छावण्या कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, कर्जवसुली कधी थांबवणार हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे. सरकारने इमानी शेतकऱ्याला फसवले आहे. ५ हजार रुपयांत काय होते ? एक लाख रुपये हेक्टरी रुपयांची शेतकरी मागणी करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा : गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा

आमच्यातही मैत्रीपूर्ण लढत

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढत असून आमच्यात समन्वय असल्याचे त्या म्हणाल्या. उबाठा गटाकडून उमेदवार दिल्याच्या मुद्यावर त्या म्हणाल्या, एखाद्या निवडणुकीत एखाद्या उमेदाराचीही निवडणूक लढायची इच्छा असते. अशा गोष्टी होत असतात. सत्ताधाऱ्यांमध्येही मैत्रीपूर्ण लढती होत आहेत तशाच आमच्यातही मैत्रीपूर्ण लढत होत आहेत. मात्र आम्ही एकत्रच आहोत, आमच्यात रोज संवाद होतो, आमच्यात समन्वय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्याची गोड बातमी लवकरच येईल असंही त्या म्हणाल्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली?

    Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि रखडलेली आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

  • Que: सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवर सुप्रिया सुळे यांनी काय टीका केली?

    Ans: सरकारने केवळ ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून तीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, अशी टीका त्यांनी केली. नमो योजनेचे थकीत हप्तेही तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली.

  • Que: शेतकऱ्यांच्या इतर कोणत्या समस्या सुप्रिया सुळे यांनी मांडल्या?

    Ans: शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जवसुली थांबवणे, शेतीसाठी मंजूर कर्जावरील स्थगिती दूर करणे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला.

Web Title: Mp supriya sule has made a major demand to the state government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा
1

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा

CM Devendra Fadnavis : दहा हजार मते इनव्हॅलिड होत असतील तर मतदारांना डिग्री कोणी दिली?
2

CM Devendra Fadnavis : दहा हजार मते इनव्हॅलिड होत असतील तर मतदारांना डिग्री कोणी दिली?

Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह
3

Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं
4

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.