Crime news live updates
मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी आली आहे. विमानतळ पोलिसांना धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
17 May 2025 04:18 PM (IST)
कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या घुसखोरांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघे मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कलमांन्वये आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खान, शेख, हवालदार यांनी पंधरा दिवसांपूर्वी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले.
17 May 2025 03:54 PM (IST)
कल्याणमधील वाडेघर पाडा परिसरात भोईर यांच्यात एका कारणावरून जुना वाद सुरु आहे. या वादातून शुक्रवारी रात्री अभिषेक भोईर या तरुणाला दुसऱ्या गटातील काही लोकांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत अभिषेक हा खडकपाडा पोलीस ठाण्यात गेला. त्याला मारहाण करणारा गटही त्याठीकाणी पोहचला. दोन्ही गटामध्ये महिलांचा देखील समावेश होता. दोन्ही गटाचे लोक पोलीस ठाण्यात आपसात भिडले. पोलीस ठाण्यात यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
17 May 2025 03:53 PM (IST)
एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वेमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या हँड बॅगमधील सुमारे सव्वा लाखाचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक १५ रोजी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात प्लॅटफार्म क्र १ वर रेल्वेमध्ये चढताना घडली आहे. याबाबत कलम हनुमंत हवालदार (रा. नेरुळ मुंबई) यांनी कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
17 May 2025 03:40 PM (IST)
कल्याणमधील कुख्यात आणि फरार बिल्डर सलमान डोलारे याच्या विराेधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे. कल्याणचे तहसील कार्यालयातील तलाठी जे. बी. सुर्यवंशी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सलमान डोलारे याच्या विरोधात आत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहे. मात्र त्याचा शोध अद्याप लागलेला नाही.
17 May 2025 03:39 PM (IST)
कल्याणमधील वाडेघर पाडा परिसरात भोईर यांच्यात एका कारणावरून जुना वाद सुरु आहे. या वादातून शुक्रवारी रात्री अभिषेक भोईर या तरुणाला दुसऱ्या गटातील काही लोकांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत अभिषेक हा खडकपाडा पोलीस ठाण्यात गेला. त्याला मारहाण करणारा गटही त्याठीकाणी पोहचला. दोन्ही गटामध्ये महिलांचा देखील समावेश होता. दोन्ही गटाचे लोक पोलीस ठाण्यात आपसात भिडले. पोलीस ठाण्यात यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
17 May 2025 03:30 PM (IST)
पुणे: दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी, देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे सुळे यांनी आभार मानले आहेत.
17 May 2025 02:57 PM (IST)
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय दहशतवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. त्याच क्रमाने, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवरही कारवाई करण्यात आली. यासाठी सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. दरम्यान, राज्य तपास यंत्रणेने (SIA) मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
17 May 2025 02:29 PM (IST)
सातारा शहर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या १० किलो ६२० ग्रॅम गांजा बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातील २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा व दुचाकी असा ३ लाख ३५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरात एक इसम मोपेडवरून गांजा घेऊन जाणार आहे. पोलिसांनी या युवकाचा शोध घेऊन सातारा शहरात त्याला अटक केली. अतुल धनाजी भगत (वय २७, राहणार परिमल रेसिडेन्सी, पहिला मजला, गणेश चौक कोडोली) असे संबंध युवकाचे नाव आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान बिले अधिक तपास करत आहेत.
17 May 2025 01:03 PM (IST)
चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर वाघोली येथील तब्बल १० एक्कर जमिन हडपण्याच्या उद्देशाने फौजदारीपात्र कट रचून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस निरीक्षक सध्या शहरात आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील एकाला अटक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आनंद लालासाहेब भगत याला अटक केली आहे. तर, शैलेश सदाशिव ठोंबरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिध्द लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात महिला गुन्हे निरीक्षक अधिकाऱ्यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली आहे.
17 May 2025 11:45 AM (IST)
केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांच्या सात शिष्टमंडळांना परदेश दौऱ्यावर पाठवणार आहे. प्रत्येक टीममध्ये 5 खासदार असतील. यातील एका खासदाराकडे त्या ग्रुपचं नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने शनिवारी या टीम लीडर्सची नावे जाहीर केली. या यादीत भाजपचे दोन, काँग्रेस, डीएमके, जेडीयू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरविषयी हे खासदार दहशतवादाबाबत भारताचा संदेश जगभर देतील. या मोहिमेचे नेतृत्व खासदार शशी थरूर करणार आहेत.
17 May 2025 11:44 AM (IST)
एक संतापजनक बातमी समोर आली आहे. कुरकुंभ (ता. दौंड) मधून साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
17 May 2025 11:29 AM (IST)
कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा एका इसमाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
17 May 2025 11:27 AM (IST)
वसई-विरार महापालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ED) ने छापा टाकला. वसई आणि हैद्राबाद येथील त्यांच्या घरांवर एकाच वेळी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ८ कोटी रुपये रोख रक्कम आणि सुमारे २३ कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुरू करण्यात आली असून, ईडीच्या या कारवाईमुळे वसई-विरार महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, इतर संबंधित व्यक्तींच्या व्यवहारांचीही तपास यंत्रणा बारकाईने छाननी करत आहे.