Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : रायगड सायबर पोलीसांची मोठी कारवाई ; ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सच्या आडून कोट्यवधींची फसवणूक

ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सपासून लांब राहण्याचं आवाहन आणि जनजागृती सायबर क्राईमच्या वतीने कायमच करण्यात येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगात सर्वात जास्त सायबर हल्ले होताना दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 25, 2025 | 08:34 PM
Crime News :  रायगड सायबर पोलीसांची मोठी कारवाई ; ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सच्या आडून कोट्यवधींची फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सपासून लांब राहण्याचं आवाहन आणि जनजागृती सायबर क्राईमच्या वतीने कायमच करण्यात येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगात सर्वात जास्त सायबर हल्ले होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करणा-या एका रॅकेटचा पर्दाफाश रायगड सायबर पोलीसांनी केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल 44 म्युल बँक खात्यांमधील तब्बल 19 कोटी 44 लाखांहून अधिक रक्कमवर पोलीसांनी स्थिगिती आणली आहे.

अलिबाग येथील अमित बापू जाधव (वय 37) यांना मोबाईलवर वारंवार ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सची जाहिरात दिसत होती. कायदेशीर असल्याचा भास झाल्याने त्यांनी AM999, माधुर मटका, PARIMATCH ही अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्यात 10,000 रुपये गुंतवले. मात्र त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

Crime News: माजी उपसरपंचावर खंडणीचा गुन्हा; पोलिसांनी असे काही केले की…; व्हाल थक्क

सायबर पोलिसांनी तपासात 25 पेक्षा जास्त ऑनलाईन गेमिंग अॅप्स उघड केले आहेत. यात AM999, Madhur Matka, PARIMATCH, BETVIBE, Casinodays, Bluechip, 1XBET, Teenpatti, Forex, 4rabet यांसारख्या लोकप्रिय नावांचा समावेश आहे. हे सर्व अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध असल्याने अनेकांना ते कायदेशीर वाटत होते.

 

एकूण 44 म्यूल बँक खाती गोठवली

गोठविलेली रक्कम – ₹19,44,03,493

आरोपी भारमल हनुमान मिना (रा. राजस्थान) अटक

आणखी 5 आरोपींचा शोध सुरू

आरोपीच्या नातेवाईकांच्या खात्यातून रोज जवळपास ₹1 लाख कमाई

फसवणुकीतून अल्पवयीन मुलांचादेखील सहभाग

 

फिर्यादी व इतर साक्षीदारांनी IDFC बँकेच्या भुवनेश्वर शाखेतून 50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या –

Payque Solutions (सुझाता साहू) च्या खात्यात 114 कोटींचे व्यवहार

La Pitura (सौभाग्य रंजन बेहेरा) च्या खात्यात 186 कोटींचे व्यवहार

New3g Service (रामकांत साहू) च्या खात्यात 56 कोटींचे व्यवहार

यामध्ये APEXIO Ltd. या कंपनीचे डायरेक्टर स्मितिका बोस व काही बँक अधिकाऱ्यांचादेखील सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

पोलिसांचा यशस्वी सापळा

सायबर पोलीस स्टेशन रायगड-अलिबाग येथील निरीक्षक रिजवाना नदाफ व सहका-यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी भारमल मिना याला राजस्थानातून अटक करण्यात आली असून, अजून पाच जणांविरोधात शोधमोहीम सुरू आहे.या संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक आचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाने रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अजून किती लोकांचे पैसे अशा बेकायदेशीर अ‍ॅप्समध्ये अडकले आहेत याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Crime news raigad cyber police takes major action fraud of crores under the guise of online gaming apps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज
1

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
2

गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…
3

Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…

Crime News: माजी उपसरपंचावर खंडणीचा गुन्हा; पोलिसांनी असे काही केले की…; व्हाल थक्क
4

Crime News: माजी उपसरपंचावर खंडणीचा गुन्हा; पोलिसांनी असे काही केले की…; व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.