माजी उपसरपंचावर खंडणीचा गुन्हा
1. पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
2. माजी उपसरपंचावर खंडणीचा गुन्हा
3. शिक्रापूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
शिक्रापूर: कोरेगाव भीमा ता. शिरुर गावचा माजी उपसरपंच असलेला सराईत गुन्हेगार गणेश फडतरसह त्याच्या साथीदारांनी एका चालकाला खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. त्यानंतर त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलिसांनी याबाबत गुन्हे दाखल केला. त्यानंतर माजी उपसरपंच व त्याच्या साथीदारांची गावातून चक्क धिंड काढली असल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील किऑन इंदोया प्रायवेट लिमिटेड कंपनीतील कॅन्टीन चालक रोहन शिंदे यांना कोरेगाव भीमाचा माजी उपसरपंच असलेला सराईत गुन्हेगार गणेश फडतरे याने वारंवार फोन करुन भेटल्याची विनंती केली होती, त्यांनतर २४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास गणेश फडतरे विशाल शिवले व त्यांच्या एका मित्राने सदर कंपनीच्या गेटवर जाऊन कॅन्टीन चालक रोहन शिंदे याला बोलावून घेत त्यांच्या जवळील गाडीमध्ये बसवून घेऊन जात त्याला दमदाटी करुन तुला या कंपनीत कॅन्टीन चालवायचे असेल तर आम्हाला महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागेल असे म्हणत दांडक्याने मारहाण केली.
दरम्यान गणेश फडतरे याने रोहन शिंदे यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची चैन व खिशातील दहा हजार रुपये असलेला पाकीट काढून घेतले. त्यांनतर देखील रोहन या मारहाण करत याला आज संपवून टाकू असे म्हणत तिघांनी बेदम मारहाण केली. त्यांनतर रोहन शिंदे यांनी त्यांच्या तावडीतून पळून जाऊन पोलिसांना फोन करत माहिती दिली. याबाबत रोहन प्रकाश शिंदे वय ३९ वर्षे रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कोरेगाव भीमाचा माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे वय ३४ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, विशाल बाळासाहेब शिवले वय ३४ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांच्या सह एक अनोळखी युवक यांच्या विरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण, जबरीचोरी प्रकरणी गुन्हे दाखल केला. त्यांनंतर दोघांना तातडीने अटक केली असून पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व त्यांच्या पथकाने कोरेगाव भीमा या गावातून थेट माजी उपसरपंच असलेल्या गणेश फडतरे व विशाल शिवले यांची हातात बेड्या घातल्या आहेट. त्यांच्याच गावातून धिंड काढत त्यांची दहशत मोडून काढली आहे.
गणेश फडतरेचे अनेक कारनामे . . . . . . .
कोरेगाव भीमा गावचा माजी उपसरपंच असलेल्या गणेश फडतरेवर खुनाचा प्रयत्न करण्याचे पाच गुन्हे, या शिवाय गर्दी, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर वाळू तस्करी करणे व अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल आहेट. त्याने अनेक वाहन चालकांना त्रास देऊन मारहाण केली असून यापूर्वी एका बड्या उद्योजकाला देखील दमदाटी केल्याची घटना घडलेली आहे, तर त्याच्या दहशतीमुळे अनेकांनी तक्रारी केल्या नसून गणेश फडतरेचे आता अनेक कारनामे पुढे येणार आहे.