महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन; CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने महिला सहाय्यक उपनिरीक्षकांची (ASI) गळा दाबून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. अरुणाबेन नातूभाई जाधव (वय २५) असं मृत सहाय्यक उपनिरीक्षकं नाव आहे. तर दिलीप डांगचिया असं आरोपीचं नाव असून त्याची पोस्टींग मणिपूरमध्ये आहे. ही घटना कच्छ जिल्ह्याच्या अंजार शहरात घडली आहे.
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव मूळच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील देरवाडा गावच्या रहिवासी होत्या आणि अंजारमधील गंगोत्री सोसायटी-२ मध्ये राहात होत्या. या दरम्यान दिलीप आणि अरुणाबेन यांची मैत्री झाली आणि दोघं पुढे एकमेकांच्या प्रेमात अडकले. त्यानंतर दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होते. अनेक वर्षे दोघं रिलेशनमध्ये राहिले होते. लवकरच दोघं लग्न करणार होते.
मात्र शनिवारी काही कारणास्तव दोघांमध्य वाद झाला आणि याच रागातून दिलीपने अरुणाबेनची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत:पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. सकाळी १० पर्यंत तो मृतदेहासोबत होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान या घटनेनंतर गुजरातमध्ये खळबळ माजली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईतील विक्रोळी येथे घडलेल्या अशाच एका घटनेत, एका ३७ वर्षीय विवाहित महिलेची एका पुरूषाने निर्घृण हत्या केली होती. त्याने तिला प्रेमात अडकवल्याचा आरोप होता. विक्रोळी पोलिसांनी घटनेच्या आठ तासांत आरोपी हनासा शफीक शाह (२५) हिला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपीने महिलेवर लग्न करण्यासाठी दबाव आणत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली.