Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

शहापूर व वडगाव पोलीस ठाण्यांमध्ये जोरदार वाद उफाळून आला आहे. हा वाद थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्याने पोलीस दलातच खळबळ माजली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 04:09 PM
घरफोडीमधील मुद्देमाल 'गायब' की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

घरफोडीमधील मुद्देमाल 'गायब' की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

Follow Us
Follow Us:
  • घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ?
  • पोलिसांतील वाद चव्हाट्यावर
  • शहापूर पोलीस वाहन प्रकरणात दोषी
इचलकरंजी : घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत केल्याचा दावा करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये आणि चारचाकी वाहनाबाबत गंभीर तफावत आढळून आल्याने शहापूर व वडगाव पोलीस ठाण्यांमध्ये जोरदार वाद उफाळून आला आहे. हा वाद थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्याने पोलीस दलातच खळबळ माजली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासात शहापूर पोलीस वाहन प्रकरणात दोषी आढळून आले आहेत. तर सोने प्रकरणात या पोलिसांना क्लिन चिट दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील घरफोडीच्या गुन्ह्यात शहापूर पोलिसांनी काही संशयितांना अटक केली होती. चौकशीत संशयितांकडून इचलकरंजी, जयसिंगपूरसह विविध ठिकाणांवरील तब्बल ९ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला. या कारवाईदरम्यान सुमारे ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत केल्याचे पोलिसांनी दाखवले होते.

मुद्देमालबाबत स्पष्टता नसल्याने संशय

दरम्यान, एका स्वतंत्र घरफोडीच्या तपासासाठी शहापूर पोलिसांनी एका संशयिताला वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. वडगाव पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता, चोरीतील सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल आधीच शहापूर पोलिसांकडे जमा केल्याचे संशयितांनी सांगितले. मात्र, या मुद्देमालाची प्रत्यक्ष शहानिशा करताना कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध मुद्देमालात मोठी तफावत असल्याचे समोर आले. यावरून शहापूर व वडगाव पोलिसांमध्ये तीव्र वाद झाला. मुद्देमाल नेमका किती, कुठे आणि कोणाच्या ताब्यात आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने संशयाची सुई थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे वळली आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत चौकशीचे आदेश दिले.

अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी चौकशीची धुरा हाती घेत इचलकरंजी, सांगली आणि जयसिंगपूर परिसरातील आठ सराफ व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावले आहे. चोरीतील सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीबाबत तसेच पोलिसांकडे जमा करण्यात आलेल्या मुद्देमालासंदर्भात त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

सोने कुठे गेले? पोलिसांच्याच नोंदी संशयास्पद

घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये व गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनात गंभीर तफावत आढळल्याने शहापूर व वडगाव पोलिस ठाण्यांमध्ये खळबळजनक वाद उफाळला. संशयितांनी मुद्देमाल शहापूर पोलिसांकडे दिल्याचा दावा केल्यानंतर प्रत्यक्ष मुद्देमाल ‘गायब’ असल्याचे संकेत मिळाल्याने प्रकरण थेट वरिष्ठ पातळीवर गेले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षकांकडून चौकशी सुरू असून, दोष कुणाचा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोने प्रकरणात काहीच तथ्य आढळून आले नाही. मात्र चारचाकी वाहन प्रकरणात शहापूर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळल्याचे आढळून आले आहे. तसा अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे सादर करण्यात आला आहे. – अप्पर पोलीस, अधिक्षक आण्णासाहेब जाधव

Web Title: There has been a dispute between shahapur and vadgaon police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Theft Cases

संबंधित बातम्या

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
1

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…
2

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना
3

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.