Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

पहिल्या पत्नीचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुसरी पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळवून लढत देत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 02:56 PM
ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी...

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी...

Follow Us
Follow Us:
  • ऐन निवडणुकीत गोंधळ
  • पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न
  • पहिल्या पत्नीची पोलिसांकडे तक्रार
लोणी काळभोर : पहिल्या पत्नीशी वैवाहिक नाते कायदेशीररीत्या अस्तित्वात असताना पतीने दुसऱ्या महिलेशी दुसरे लग्न करून सहजीवन सुरू केले आणि सोशल मीडिया माध्यमांवर दुसऱ्या महिलेला पत्नी म्हणून दर्शवून फोटो, स्टेटस् व पोस्ट अपलोड करून पहिल्या पत्नीचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुसरी पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळवून लढत देत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर नामदेव काळभोर (पती), पूनम बाबूराव गायकवाड (दुसरी पत्नी), नवनाथ नामदेव काळभोर (दीर), स्नेहल नवनाथ काळभोर (जाऊ, सर्व रा. – लोणी काळभोर), तसेच पतीचे नातेवाईक निर्मला चौधरी (पतीची मावशी, रा. लोहगाव, पुणे) नंदा उत्तम बोत्रे (पतीची मावशी), उत्तम बोत्रे (पतीच्या मावशीचे पती), दत्तात्रेय रंगनाथ भाडळे (पतीचे मामा), ऋषाली नीलेश बोत्रे व प्रणाली स्वप्नील बोत्रे (सर्व रा. सालूमालू पारगाव, ता. दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पहिल्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, या फिर्यादीनुसार पोलिसांनी वरील दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सिद्धेश्वर काळभोर व पुनम गायकवाड हिने २३ जून २०२० रोजी व त्यानंतर तिच्या मोबाइलवरून पीडितेच्या मोबाइलवर अश्लील भाषेत मेसेज व टेक्स्ट मेसेज केले. तसेच, पतीसह वरील दहा जणांनी पीडितेचा मानसिक छळ केला. तसेच, त्यांना तिच्या वैध विवाहाची पूर्ण माहिती असूनही त्यांनी पूनम गायकवाड यांच्यासोबत एकत्र काढलेला फोटो व पूनम गायकवाड हिच्या नावापुढे सिद्धेश्वर काळभोर, असे नाव लावत असल्याचे फोटो स्टेटसला ठेवला व अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून त्यास पाठिंबा दिल्याने तिची बदनामी झाली आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्रचारादरम्यान घरोघरी फिरून पूनम गायकवाड ही पीडितेच्या नवऱ्याची पत्नी असल्याबाबत प्रचार करीत आहे व व्हॉट्सॲप स्टेट्सला तसे ठेवत आहे. पीडितेची दोन मुलेही मोबाइलवर व्हॉट्सॲप स्टेट्स पहात असल्याने त्यांच्याही मनावर गंभीर परिणाम होत आहे, अशी तक्रार दिली. त्यावरून वरील १० जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्…; संशयितास कोर्टाने थेट…

Web Title: A woman has filed a police complaint against ten people including her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
3

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
4

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.