डिलिव्हरी बॉक्सवरील लेबलद्वारे होतेय ग्राहकांची फसवणूक, सायबर गुन्हेगारांचे नवीन टार्गेट (फोटो सौजन्य-X)
मुंबई : आजकाल ऑनलाइन शॉपिंग खूप सामान्य आहे. बरेच लोक ऑनलाइन वस्तू ऑर्डर करणे पसंत करतात आणि भारतात Amazon आणि Flipkart या सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट आहेत. जेव्हा तुम्ही या वेबसाइट्सवरून काही ऑर्डर करता तेव्हा ते एका चांगल्या पॅक केलेल्या बॉक्समध्ये येते. तुम्ही वस्तू बाहेर काढता आणि बॉक्स फेकून देता. इथेच गोष्टी चुकीच्या होऊ शकतात आणि तुम्ही डिलिव्हरी बॉक्स घोटाळ्याला बळी पडू शकता.
सगळ्याच सायबर घोटाळ्यांमध्ये हॅकिंगचा सहभाग नसतो. काही घोटाळे आपल्या दैनंदिन सवयींमुळे होतात. शिपिंग लेबल न काढता एखादा डिलिव्हरी बॉक्स फेकून देण्यात काय नुकसान असणार आहे, असे आपल्याला वाटू शकते, पण तसे केल्याने तुमचे नाव, फोन नंबर आणि पत्ता यांसारखे वैयक्तिक तपशील उघड होत असल्याचे जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्सने ग्राहकांच्या निदर्शनास आणले आहे. घोटाळेबाज या तपशीलांचा उपयोग करून स्वतः वैध असल्याची बतावणी करून तुमच्याकडून आणखी संवेदनशील डेटा काढून घेऊ शकतात. अशा धोक्यांपासून सावध राहणे ही सुरक्षित राहण्याची पहिली पायरी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
प्रत्येक डिलिव्हरी बॉक्सवर काही महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते जशी की, तुमचे नाव, पत्ता आणि फोन नंबर. सायबर गुन्हेगार बऱ्याचदा असे फेकून दिलेले बॉक्स कचऱ्याच्या डब्यातून गोळा करतात आणि त्याच्यावर असलेल्या माहितीचा उपयोग कुरियर एजंट किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून बतावणी करण्यासाठी करतात. त्यांच्याकडे पुरेसा डेटा गोळा झाल्यानंतर त्यांचे संभाषण खरे वाटते आणि मग घोटाळा होतो.
संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यामुळे किंवा अज्ञात क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे मालवेअर हल्ले किंवा आर्थिक घोटाळा होऊ शकतो. एका साध्या बॉक्स लेबलपासून सुरू झालेला हा प्रकार मोठ्या ओळख-चोरीच्या मामल्यापर्यंत पोहोचू शकतो.
स्रोताची तपासणी / खात्री केल्याशिवाय कधीही पैसे ट्रान्सफर करू नका किंवा ओटीपी सहित कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
या डिजिटल युगात भौतिक कचरा देखील सायबर गुन्ह्यासाठी मदतरूप ठरू शकतो. सावध राहून आणि वैयक्तिक डेटा आपण कसे हातळतो याबाबतीत छोटे छोटे सजग बदल करून तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण करू शकता. जर तुम्ही एखाद्या गुन्ह्याला बळी पडला असाल किंवा सायबर घोटाळ्याची शंका तुम्हाला असेल, तर आपल्या स्थानिक कायदा अंमलबजावणीशी संपर्क साधा किंवा १९३० वर सायबर क्राइम हेल्पलाइन मार्फत किंवा सायबरक्राईम.जीओव्ही.इनवर तत्काळ त्याची तक्रार करा.
सायबर जागरूकता आणि शिक्षणाच्या मदतीने अधिक सुरक्षित, लवचिक समुदायाची उभारणी करण्याबाबत फेडएक्स वचनबद्ध आहे, ज्यातून एक जागतिक लॉजिस्टिक्स अग्रणी या नात्याने आमच्या ग्राहकांचे, टीम सदस्यांचे आणि समुदायांचे रक्षण करण्याबाबतची आमची जबाबदारी प्रतिबिंबित होते.