दोन्ही तरुण एकमेकांच्या प्रेमात, नंतर नशेत तरुणाचे जेंडरच केलं चेंज (फोटो सौजन्य-X)
Madhya Pradesh Crime In Marathi: मध्य प्रदेशातील नर्मदापुरममध्ये एका तरुणावर त्याच्या जिवलग मित्राचे लिंग बदलून त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडितेने त्याच्या जिवलग मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. नेमकं काय आहे प्रकरण?
पीडितेने भोपाळमधील एका पोलीस ठाण्यात आरोपी शुभम यादवविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. शुभम हा नर्मदापुरममधील ग्वाल्टोली येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेला तंत्रविद्येचे आमिष दाखवून मित्राचे लिंग बदलले. नंतर मित्राला मुलगी म्हणून राहण्याच भाग पाडले. पीडित मुलाने सांगितले की, आरोपीने सुरुवातील मित्राला ड्रग्ज दिले, नंतर १८ दिवस त्याला चाकूच्या धाकावर ओलीस ठेवले आणि त्याच्यासोबत वाईट कृत्ये करत राहिला. आरोपीने नर्मदापुरममधील हॉटेलमध्येही वाईट कृत्ये केली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
हा पीडित तरुण औबेदुल्लागंज शहरातील रहिवासी आहे, त्याच्या बहिणीचं सासर नर्मदापूरम येथे आहे. तो सतत आपल्या बहिणीकडे नर्मदापूरम येथे येत जात होता. याच दरम्यान त्याची ओळख शुभम यादव नावाच्या तरुणासोबत झाली. शुभम हा ग्लालटोली येथील रहिवासी आहे. दोघांची हळूहळू ओळख वाढत गेली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शुभमने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यानंतर त्याने हॉटेलमध्ये अनेकदा माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले, त्यानंतर त्याने मला विश्वास वाटावा यासाठी माझ्या बँक खात्यामध्ये सहा लाख रुपये देखील पाठवले, असा दावा या तरुणानं केला आहे. मात्र त्यानंतर या तरुणासोबत मोठं कांड घडलं आहे.
आरोपी शुभमने पीडितेला धमकी दिली की, जर त्याने या प्रकरणासंदर्भात कोणाला काही सांगितले तर तो तरुणाला बदनाम करेल. पीडितेच्या म्हणण्यानुसार, शुभमने तरुणाचे नाव बदलून ट्विंकल ठेवले आणि या नावाने मित्राचा आयडी बनवला. त्याने ट्विंकलच्या नावाने ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देखील तयार करून घेतले, जेणेकरून मित्राची खरी ओळख कायमची पुसून टाकता येईल.
पीडितेने सांगितले की शुभम त्याला इंदूरला घेऊन गेला होता, जिथे मित्रावर जबरदस्तीने लिंग बदलासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. घटनेनंतर पीडिता घराबाहेर पडू शकत नव्हता. आरोपी शुभमने पीडितेला तिचा अपघात झाल्याचे सर्वांना सांगण्यास सांगितले होते. पीडितेने सांगितले की त्याच्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल काहीही माहिती नव्हती. घटनेनंतर पीडिता ६ महिने घरीच राहिला होता. भीती इतकी होती की पीडिताने घराबाहेर जाणे टाळले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या तक्रारीनंतर भोपाळ पोलिसांनी शून्यावर गुन्हा दाखल केला आणि डायरी नर्मदापुरम पोलिस ठाण्यात पाठवली. येथे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.