परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा
Cyber Fraud News: फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवासंबंधित बनावट संकेतस्थळ, फसवे मोबाईल अॅप्स (एपीकेएस) तसेच मोबाईल एसएमएस, व्हॉटस्अॅपद्वारे खोट्या लिंक्स पाठवून नागरिकांची फसवणूक होत आहे, वाहन चालक, मालकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे नागरिकांनी बनावट संकेतस्थळ, अॅप्स आणि ई-चालान बनावट लिंक्सपासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आणि फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा असे आवाहन परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा: 8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आठवा वेतन आयोग आजपासून होणार लागू
फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सअँप संदेशांद्वारे ‘चलन बाकी आहे’, ‘परवाना सस्पेंड होणार आहे’ अशा संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच RTO Services apk, mPar-ivahan Update.apk, eChallan Pay.apk अशी अनाधिकृत एपीके अॅप्स डाऊनलोड केल्यास मोबाईल तसेच इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.
नागरिकांनी वाहन नोंदणी सेवा (वाहन) https://vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (सारथी) https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा https://www.pariva han.gov.in तसेच ई-चलन संकेतस्थळ https://echallanparivahan.gov.i n डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे com, online, site, in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील संकेतस्थळावर वाहनधारकांनी उघडू नये. केवळ शासकीय परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
लिंक प्राप्त झाल्यानंतर तक्रार नोंदवावी.
कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.in सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलिस स्टेशन याठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप. प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे. या फसवणुकीला आळा घालायला प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






