Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने ९० लाख ५९ हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करत मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. पडेगाव परिसरात झालेली ही कारवाई शहरातील सर्वात मोठी ड्रग्ज कारवाई मानली जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 02:32 PM
छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई!
  • ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
  • मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय टोळी गजाआड
छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील मुलांना हेरुन त्यांना नशेच्या आहारी लावणाऱ्या नशेडी तस्कारांची टोळी अन् तब्बल ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेशच्या आंतरराज्यीय टोळीवर पडेगावात रविवारी (दि.१) छापा टाकून ९० लाख ५९ हजार रुपये किंमतीचे ५०३.३३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी ११ आरोपींविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज झहीर खान (३३, रा. देवास, मध्य प्रदेश), हर्ष ओमप्रकाश शर्मा (२४, रा. मुसाखेडी, इंदूर, मध्य प्रदेश), आनंद देविलाल प्रजापत (२४, रा. देवास, मध्य प्रदेश), शेख अरबाज शेख इद्रिस (२४, रा. सिल्क मिल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), नदिम शेख अलिम शेख (२२, रा. पडेगाव, संभाजीनगर), अजहर अबुबकर शेख (२८, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड), फैजान मुख्तार शेख (२१, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव), सोहेल, अयान, सागर, अरबाज व त्यांच्या १५ ते २० हस्तकांचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत आदींनी दिली.

अन् पोलिसांच्या हाती लागला

पुरवठादार मध्यप्रदेशचा अरबाज खान हा डिलर अरबाज शेख याचा चुलत भाऊ आहे. तसेच अरबाज खान याची जिन्सी परिसरात सासुरवाडी आहे. तो यापूर्वीही अनेक वेळा सासुरवाडीत आला होता, माञ पहिल्यावेळी एमडी घेवून तो शहरात आला आणि पोलिसांच्या हाती लागला. अरबाज खान हा सराईत आहे. भोपाळ व इंदौरसह इतर शहरात देखील ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

आरोपी म्हणतो तो युरिया

आरोपी अरबाज खान याच्याकडे एमडी बाबत चौकशी केली असता, तो युरिया असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो म्हणाला, अरबाज शेख याने मला १५ ते २० हजारांचा बोगस मालविक्री करुन गंडा घातला होता. त्यामुळे मी त्याला एमडी म्हणून हा युरिया देणार होतो, अशी थाप त्याने मारली. मात्र फॉरेन्सिक तपासणीत तो पदार्थ एमडी असल्याचे स्पष्ट झाले.

Chhatrapati Sambhajinagar News: नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

संघटीत टोळी करून शहरात ड्रग्ज विक्री

मुख्य आरोपी अरबाज झहीर खान याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता, हर्ष शर्मा, आनंद प्रजापत या मित्रांना घेवून छत्रपती संभाजीनगरातील शेख अरबाज शेख इद्रिस यास विक्रीसाठी ड्रग्ज आणल्याचे त्याने सांगितले. शेख अरबाज यांच्याकडे विचारपूस केली असता, शेख नदिम व शेख अजहर ऊर्फ अज्जू शेख व त्यांचे मित्र ड्रग्ज पावडर विकत घेणार होते. त्यासाठी त्यांना सोबत आणल्याचे उत्तर त्याने दिले. शेख अरबाज याच्याकडील तपासात वरील दोघांशिवाय सोहेल, अयान, सागर व अरबाज यांनी विक्रीसाठी हा साठा मागविल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी १५ ते २० जणांच्या हस्तकांसह संघटित टोळी बनविली असल्याचे स्पष्ट झाले.

१ ग्रॅम १८ ते २० हजारांना विक्री

एमडीची बाजारभावाने किंमत १८ ते २० हजार रुपये प्रति ग्रॅम आहे. आरोपी ५-६ हजारांना खरेदी करून दुप्पट-तिप्पट दराने विक्री करत होते.
शेख अरबाज याला समोरील व्यक्तीने १०० ग्रॅम एमडी मागितले होते. पैसा कमाविण्याच्या नादात शेख अरबाज याने ५०० ग्रॅम एमडी मागवले आणली फसला.

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

Web Title: Big action by chhatrapati sambhajinagar police md drugs worth rs 90 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Drugs Case

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?
1

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?

इयत्ता चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांची रविवारी होणार शिष्यवृत्ती परीक्षा! संभाजीनगर जिल्ह्यातून ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांची नोंद
2

इयत्ता चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांची रविवारी होणार शिष्यवृत्ती परीक्षा! संभाजीनगर जिल्ह्यातून ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांची नोंद

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?
3

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त
4

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.