Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना

Cyber Fraud News: सायबर चोरट्यांनी अवघ्या काही मिनीटांत या दोघांच्या बँक खात्यावरून तब्बल सव्वादोन लाख रूपये काढून घेतले. मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवीत चोरट्यांनी संधी साधली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 25, 2025 | 03:10 PM
ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! (Photo Credit- AI)

ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नाशिकमध्ये सायबर चोरट्यांचा हैदोस!
  • गुगलवर हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडले महागात
  • दोन मिनिटांत सव्वा दोन लाख लंपास
Cyber Fraud Nashik: नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्पिटलचा क्रमांक गुगल आणि पुढे जस्ट डायलवर शोधणे एका नोकरदार महिलेस एकास चांगले महागात पडले. सायबर चोरट्यांनी अवघ्या काही मिनीटांत या दोघांच्या बँक खात्यावरून तब्बल सव्वादोन लाख रूपये काढून घेतले. मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवीत चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकी घटना काय घडली?

हनुमाननगर भागात राहणाऱ्या नोकरदार महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. नियमीत आरोग्य तपासणीसाठी महिलेने गेल्या १८ ऑक्टोबर रोजी जस्ट डायल वर संपर्क साधून पिंप्रीकर हॉस्पिटलचा नंबर मिळवला होता. यानंतर ९३४१६७०१३४ या मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधण्यात आला.

हे देखील वाचा: Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक

अशी झाली फसवणूक

संबधिताने सदर हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगून नंबर लावण्यासाठी व्हॉटसअपवर पाठविलेल्या लिंकवर माहिती भरण्यास सांगून ही फसवणुक केली. महिलेने सदर लिंकवर आपली गोपनीय माहिती भरली असता रविवारी (दि.२१) सायंकाळी तिच्या बँक खात्यातील १ लाख ३९ हजाराची रोकड परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेण्यात आली. याच प्रमाणे श्रीरामनगर भागात राहणारे महेंद्र उत्तम कापसे यांची सुद्धा सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातील ८८ हजार रूपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन काढून घेतली.

पोलिसांचे आवाहन: अशी घ्या काळजी!

अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक पाटील करीत आहेत. गुगलवर समोर दिसणाऱ्या नंबरवर थेट क्रमांक लावण्याऐवजी नागरिकांनी तो टिपून मग डायल करणे उचित ठरते. यामुळे सायबर चोरट्यांना वापरकर्ता ऑनलाईन पद्धतीने कोठे कॉल करतो, याची माहिती मिळत नाही. गुगल सर्च करताना अशा खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या हव्यात, असे मत सायबर पोलिसांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा: हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल

Web Title: Cyber fraudsters swindled two people out of lakhs of rupees in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • cyber crime
  • Cyber Fraud
  • Nashik Crime
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ
1

Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा
2

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Mumbai Cyber Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाची 9 कोटींची फसवणूक; साताऱ्यातील तरुण अटकेत
3

Mumbai Cyber Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाची 9 कोटींची फसवणूक; साताऱ्यातील तरुण अटकेत

Yeola Nagar parishad Election Result : छगन भुजबळांची जादू आजही कायम! रुग्णालयात असुनही खेचून आणला विजयश्री
4

Yeola Nagar parishad Election Result : छगन भुजबळांची जादू आजही कायम! रुग्णालयात असुनही खेचून आणला विजयश्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.