पिता-पुत्राने चोरले बांधकाम साहित्य (फोटो- istockphoto)
सातुर्णा परिसरातील प्रकरण,जागेचा होता वाद
वाद चिघळण्याची शक्यता अधिक
राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
अमरावती: अमरावती-बडनेरा मार्मावरील (Amravati) सातुर्गा परिसरात सुरू असलेल्या जमीन वादाने आता गुन्हेगारी वळण घेतले आहे. बांधकाम साहित्य चोरी, धमकी व अतिक्रमणाच्या आरोपांमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी प्रसिद्ध व्यावसायिक विष्णु प्रसाद व्यास, त्यांचा मुलगा ध्रुव आास व एका अन्य व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हरीश आडवाणी (३२. रा. नवजीवन कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी व त्यांचे वडील हरीश आडवाणी यांनी सातुर्गा परिसरात सर्वे क्रमांक-१७/२/मधीला २० आर जमीन कायदेशीररित्या खरेदी केली आहे.
या भूखंडाचे अधिकृत मोजमाप २३ नोव्हेंबरला झाले आहे. मोजमापात रुंदी ८० फूट व लांबी २६१ फूट असल्याचे स्पष्ट झाले आहे, या जमिनीवर शेजारील भूखंडधारकांकडून सिमेंटची प्रिकास्ट भिंत उभारण्यात आली. याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल आडवाणी गेले असता, त्यांना औषध दुकानात बोलावून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या भूखंडाच्या सुरक्षेसाठी आडवाणी यांनी तेथे सीसीटीवी कैमरे बसवले होते. त्या ठिकाणी सीसीटीव्ही साहित्य व इतर बांधकाम साहित्य मिळून सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज ठेपला होता.
Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक
तक्रारीनुसार, हे साहित्य व्यास पिता-पुत्र च त्यांच्या सहकाऱ्याने तेथून उचलून नेले, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेज पोलिस्यांच्या ताब्यात देण्यात आहे. राजापेठ पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत.
वाद चिघळण्याची शक्यता अधिक
काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात विष्णू व्यास यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल आडवाणी पांच्यावर जमीन चळकावण्याचा आरोप केला होता. मात्र, आता थेट गुन्हा दाखल झाल्याने हा बाद केवळ खासगी स्वरूपाचा न राहता कायदा-सुव्यवस्थेचा प्रान बनत चालल्याचे चित्र आहे. तपामाअंती नेमकी सत्यता काय समोर येते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा: विवाहित महिला घराबाहेरील बाथरूममध्ये गेली अन्…; देवरुखमध्ये घडली भयंकर घटना
एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक
छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध शाखेने मोठी कारवाई केली आहे. नगर रोड न परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करत असताना एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात ते येणाऱ्या नायट्रोसेन-१० गोळ्या, गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, एक पैशांचे बंडल आणि कार असा एकूण १० लाख १० हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर रोजी राजी करण्यात आली आहे.






