मालेगावात लहान मुलांच्या वादातून दोन गटांत गोळीबार आणि हाणामारी झाली. मुख्य आरोपी मेहताब अलीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...
नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.
नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय आणि विविध विकासकामांना गती दिली असून राज्य शासनाकडून विकास कामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १४,७०५ पैकी केवळ ६३५९ शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. ई केवायसी झाल्यानंतरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वर्ग होणार आहे.
मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालीत असतांना दोन परप्रांतीय व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर आहे.
Samruddhi Mahamarg : नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी सहा तासांचा मोजावा लागणारा कालावधी पाहता नाशिकच्या मंत्र्यांना नाशिकलाच टाळून मुंबई गाठणे अधिक सोपीस्कर वाटू लागले आहे.
नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रस्ता रोको करत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला योग्य भाव नसतांना कंपन्यानी दोनश रुपये खताच्या गोण्याच्या मागे भाव वाढले.
रस्त्यावर अशाच प्रकारे वाहनाची मोडतोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्या पालकांना थेट पोलीसात पाचारण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे.
२०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. मात्र, वेरुळ-पैठणसह महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांवरील सुविधा निर्मितीचे काम अद्याप कागदावरच आहे.
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपी कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
राजनाथ सिंह यांनी LCA MK-1A साठीची तिसरी उत्पादन लाइन आणि HTT-४० विमानासाठीची दुसरी उत्पादन लाइन राष्ट्राला समर्पित केली. या उत्पादनांमुळे भारतीय हवाई दलाची एकूण ताकद आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार…
नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत टोळक्याने त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तरुणाचे नाव चंद्रकांत विश्वकर्मा नाव आहे.
नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला…
नाशिकमध्ये एका दिवशी सलग तीन खुनं; उपनगरात प्रॉपर्टी वादातून, सातपूर आणि नाशिकरोडमध्ये मुलाने आईचा निर्घृण खून केला. शहरात वाढती गुन्हेगारी नागरिकांमध्ये भीती आणि संताप निर्माण करत आहे.