Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

मनात भीती अन् डोळ्यात अश्रू; एका १७ वर्षीय मुलीवर चालत्या कारमध्ये झालेल्या त्या नृशंस प्रकाराने संपूर्ण देश हादरला. धावत्या गाडीत वेदनेने विव्हळत असतानाच झालेली प्रसूती अन् नंतर मृत बाळ... या सगळ्या रहस्यामागे दडलेले सत्य नेमके काय?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 22, 2026 | 05:12 PM
धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

Follow Us
Follow Us:
  • १६ वर्षीय गर्भवती मुलीचे कारमधून अपहरण.
  • अत्याचारादरम्यान पीडितेची गाडीतच प्रसूती झाली.
  • फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना.

देशाला हादरवून टाकणारी आणि अंगावर काटा आणणारी एक अत्यंत संतापजनक घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून समोर आली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे जगण्याचे स्वप्न पाहण्याचे वय असते, तिथे एका अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. आधीच गर्भवती असलेल्या या अल्पवयीन मुलीचे तीन नराधमांनी कारमधून अपहरण केले आणि दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या परिसरात तिच्यावर धावत्या गाडीत आलटून-पालटून सामूहिक बलात्कार केला. या भीषण यातना सहन करत असतानाच पीडितेची गाडीमध्येच प्रसूती झाली. या घटनेने मानवता पूर्णपणे लाजीत झाली आहे.

नेमकी काय होती घटना? दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील थरार

प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही नराधमांनी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडवली. संबंधित १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आधीपासूनच गर्भवती होती. रात्रीच्या वेळी तीन नराधमांनी तिला बळजोरीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या दिशेने गाडी नेऊन धावत्या कारमध्ये तिच्यावर अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. या प्रचंड शारीरिक व मानसिक यातना आणि वेदनेदरम्यान पीडितेची धावत्या गाडीतच प्रसूती झाली आणि तिने एका कन्येला जन्म दिला. विकृतीची सर्व सीमा ओलांडल्यानंतर नराधमांनी त्या रक्तबंबाळ व वेदनेने विव्हळणाऱ्या अल्पवयीन मुलीला दौसा कलेक्टरेट चौकातील रस्त्यावर तसेच सोडून दिले आणि तिथून पसार झाले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच नवजात बालकाचा मृत्यू

रस्त्यावर असहाय्य अवस्थेत सोडून दिलेल्या आणि वेदनेने कळवळणाऱ्या पीडितेने कशीबशी हिंमत करून तेथील एका स्थानिक नागरिकाकडे मदतीची भिक मागितली. त्या नागरिकाने कोणतीही वेळ वाया न घालवता तातडीने तिला उपचारासाठी दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पीडितेने आपल्या नवजात बालकाला एका कपड्यात गुंडाळून रुग्णालयात आणले होते. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली असता, जन्माला आलेल्या त्या नवजात बालकाला मृत घोषित केले. या घटनेमुळे रुग्णालयात आणि परिसरात शोककळा पसरली असून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: मित्रांशी बोलून घरी जाताना घात; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने बुलढाणा हादरले!

आधी कशी झाली होती गर्भवती? पोलिसांचा कसून तपास सुरू

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी आधीपासूनच गर्भवती होती. यापूर्वी साधारण फेब्रुवारी आणि मे महिन्यात अजय कुमार मीणा नावाच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा गंभीर आरोप समोर येत आहे. त्यातूनच ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांनी तात्काळ दौसा जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू केले असून, आरोपींविरोधात अपहरण आणि सामूहिक बलात्कारासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या परिसरात ही घटना घडली.

  • Que: घटनेच्या वेळी नेमके काय घडले?

    Ans: अपहरण करून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार सुरू असतानाच पीडितेची प्रसूती झाली, आणि रुग्णालयात पोहोचल्यावर नवजात बालकाला मृत घोषित करण्यात आले.

  • Que: पोलिसांकडून काय कायदेशीर कारवाई सुरू आहे?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेचा जबाब नोंदवला असून, फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

Web Title: Dausa pregnant minor gang rape expressway delivery news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • crime news
  • Pregnant
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

मित्रांशी बोलून घरी जाताना घात; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने बुलढाणा हादरले!
1

मित्रांशी बोलून घरी जाताना घात; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याने बुलढाणा हादरले!

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!

AI व्हिडिओने उडवली खळबळ! कर्नाटक विधान सौधमध्ये स्फोट झाल्याचा बनाव; तरुणाला अटक
3

AI व्हिडिओने उडवली खळबळ! कर्नाटक विधान सौधमध्ये स्फोट झाल्याचा बनाव; तरुणाला अटक

Pune Crime News: लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार! पुणे सत्र न्यायालयाचा सुन्न करणारा निकाल
4

Pune Crime News: लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार! पुणे सत्र न्यायालयाचा सुन्न करणारा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.