Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: मराठी दहावीच्या विद्यार्थ्याची मेट्रोवरून उडी; सुसाईड नोटमध्ये शिक्षकांच्या छळाचा थरकाप उडवणारा आरोप

दिल्लीतील दहावीतील विद्यार्थी शौर्य पाटीलने शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करून मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी प्राचार्या आणि चार शिक्षिकांवर गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 20, 2025 | 09:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • शौर्य पाटीलने दीड पानांच्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकांच्या मानसिक छळाचा उल्लेख
  • मेट्रो स्टेशनवरून उडी घेतल्याने गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू
  • पोलिसांनी प्राचार्या व चार शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल; कुटुंब हादरले
दिल्ली : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्याने सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप केले आहेत. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव शौर्य प्रदीप पाटील असे पीडित विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता.

Ahilyanagar News: थोरात आत्महत्या प्रकरणात कलाटणी, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत

नेमकं काय घडलं?

शौर्य याने मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी दीड पानाचा सुसाइड नोट लिहिला होता. त्यात त्याने मानसिक छळाचे आरोप केले आहे.

स्कूल बॅगमध्ये सापडली सुसाईड नोट

दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली. त्यात ‘मेरा नाम शौर्य पाटील हैं… इस मोबाइल… नंबर पर कॉल कर देना प्लीज… आय अॅम व्हेरी सॉरी… आय डीड धीस…पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया… सॉरी भैय्या… सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं… स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू….असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

शौर्य मूळचा सांगलीचा

शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी शौर्याचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्ली येथे पोहोचले. आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या कोणी केली?

    Ans: शौर्य

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: दिल्ली

  • Que: गुन्हा कोणावर?

    Ans: शिक्षिका

Web Title: Delhi crime marathi 10th standard student jumps from metro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: कांदिवलीत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम
1

Mumbai Crime: कांदिवलीत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम

Mumbai Crime: गोरेगाव स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांत हाणामारी; एका विक्रेत्याचा मृत्यू
2

Mumbai Crime: गोरेगाव स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांत हाणामारी; एका विक्रेत्याचा मृत्यू

Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा
3

Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?
4

आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.