Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप

दिल्लीतील लोधी कॉलनी येथे २८ वर्षीय नवविवाहित आकृती सुतार हिचा संशयास्पद मृत्यू झाला. लग्नाला अवघे अडीच महिने झाले असताना ती इमारतीवरून पडलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी २० लाखांच्या हुंड्यासाठी हत्या झाल्याचा आरोप केला असून, पोलिसांकडून आत्महत्या, अपघात आणि घातपात अशा सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोधी कॉलनीत २८ वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; लग्नाला अवघे अडीच महिने झाले होते.
  • कुटुंबीयांचा पती व सासरच्यांवर २० लाखांच्या हुंड्यासाठी छळ व हत्येचा गंभीर आरोप.
  • दिल्ली पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
दिल्ली: दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात २८ वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर झालेल्या लव्ह मॅरेजला अवघे अडीच महिने झाले असताना घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांकडून आत्महत्या, अपघात आणि घातपात अशा सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

काय नेमकं प्रकरण?

दिल्लीतील पुष्प विहार येथे राहणारी आकृती सुतार हिचं लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर पती-पत्नीने ऑफिसमध्ये एक पार्टी देण्याचं ठरवलं होतं. शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या लोधी कॉलनीतील पालिका कुंज येथील एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून संशयास्पद रित्या खाली पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत आढळली. ज्या ठिकाणी आकृतीचा मृतदेह सापडला, ते ठिकाण तिच्या माहेरून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास काही लोकांनी तिला रस्त्यावर पडलेलं पाहिले आणि पोलिसांना याची माहिती दिली. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, परंतु घटनास्थळावर रक्ताचे कोणतेही डाग आढळले नाहीत. तिला तातडीने एम्स (AIIMS) ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आत्महत्येचा दावा आकृतीच्या कुटुंबीयांनी फेटाळला

आकृतीने आत्महत्या केली आहे, हा दावा तिच्या कुटुंबीयांनी पूर्णपणे फेटाळला आहे. त्यांनी सांगितलं की, लग्नानंतर ती १ जुलै रोजी कामावर परतली होती आणि सुट्टीचा दिवस असूनही ती शनिवारी ऑफिसला गेली होती. ऑफिसमधून निघण्यापूर्वी तिने सहकाऱ्यांसाठी एक छोटी पार्टीही दिली होती. आकृतीचे काका मनंजय सुतार यांनी आत्महत्येच्या थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “जर ती दुःखी असती किंवा स्वतःचा जीव देण्याचा विचार करत असती, तर तिने कामावर परतल्याचा आनंद का साजरा केला असता?” कुटुंबीयांनी सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आकृतीने तिच्या आईशी फोनवर संवाद साधला होता.

या संभाषणादरम्यान ती अगदी सामान्य वाटत होती. तिने ऑफिसमधील गेट-टुगेदरबद्दल सांगितलं आणि ती घरी परतत असल्याचंही म्हणाली. मात्र रात्री सुमारे ८ वाजता तिच्या पतीचा फोन आला आणि त्याने आकृती बेपत्ता झाल्याचं सांगितलं. यानंतर साधारण ९० मिनिटांनी पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली की, पालिका कुंज येथे एका महिलेचा मृतदेह सापडला आहे.

हुंड्यासाठी केली हत्या

आकृतीच्या नातेवाईकांनी तिचा पती आणि त्याच्या कुटुंबियांवर लग्नानंतर २० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला आहे. या मागणीसाठी तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता आणि धमकावले जात होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आकृतीच्या पतीने तिला अनेकदा जीवे मारण्याच्या धमकी दिली होती. तिच्या मृत्यूच्या अवघ्या दोन दिवस आधी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होतं असा दावा देखील कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

८ वर्षांचं प्रेम आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, आकृती सुतार हिचे तिच्याच ऑफिसमधील सहकारी अरस्तू सिक्का याच्यासोबत गेल्या ८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या २४ एप्रिलला या दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिला कोण होती?

    Ans: मृत महिलेचे नाव आकृती सुतार असून, तिचे २४ एप्रिल २०२६ रोजी लव्ह मॅरेज झाले होते.

  • Que: कुटुंबीयांनी कोणते आरोप केले आहेत?

    Ans: आकृतीच्या कुटुंबीयांनी पती आणि सासरच्या मंडळींवर २० लाखांच्या हुंड्याची मागणी, मानसिक-शारीरिक छळ आणि हत्येचा आरोप केला आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय आहे?

    Ans: दिल्ली पोलीस आत्महत्या, अपघात आणि घातपात अशा सर्व शक्यतांचा तपास करत असून, पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Delhi crime newlywed woman dies under suspicious circumstances hours after leaving office party 20 lakh dowry allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.