Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!

Kalyan Police News: कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हाणामारीच्या प्रकरणात एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तक्रारदाराला 'तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर' असे सांगितल्याचे ऐकू येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 17, 2026 | 03:37 PM
'तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर'; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!

'तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर'; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!

Follow Us
Follow Us:
  • पोलीस ठाण्यातच तक्रारदाराला अपमानास्पद वागणूक?
  • अमोल खोंडे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल
  • खडकपाडा पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
 

Kalyan Police News: कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्याशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हाणामारीच्या प्रकरणात एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये तक्रारदार व्यक्ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित पोलीस अधिकारी तिची तक्रार घेण्यास नकार देत असल्याचे ऐकू येत आहे.(Kalyan Police News)

‘तुझी तक्रार घेणार नाही, जे करायचे ते कर’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली बाजू मांडताना दिसत आहे. संबंधित प्रकरणात आमचीही तक्रार नोंदवून घ्या, अशी विनंती ही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांकडे करताना दिसते. मात्र, अधिकारी अमोल खोंडे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी तक्रारदार व्यक्ती, ‘आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळणार नसेल तर कुठून मिळणार?’ असा सवाल करते. त्यावर संबंधित अधिकारी, ‘न्याय कोर्टात मिळतो, तुझी तक्रार मी घेणार नाही, तुला जे करायचे ते कर,’ असे म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. या संभाषणामुळे पोलिसांकडून तक्रारदाराला कशा प्रकारची वागणूक दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओतील आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

आधी ऑडिओ क्लिप, आता व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीच अमोल खोंडे यांच्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये एका तरुणाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तक्रारदाराच्या संमतीशिवाय संबंधित प्रकरण बंद केल्याचाही दावा करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू असल्याची माहिती एसीपी विजय मराठे यांनी दिली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ समोर आल्याने खडकपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करणार?

एकामागून एक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप समोर येत असल्याने या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. तक्रारदाराची बाजू ऐकून घेण्यात आली होती का? हाणामारीच्या प्रकरणात खरोखरच एकतर्फी कारवाई झाली आहे का? तसेच व्हायरल व्हिडिओतील संभाषणाची सत्यता काय आहे? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. आता या नव्या व्हिडिओची वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेणार का? संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून काही कारवाई केली जाणार का? याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: खडकपाडा पोलीस ठाण्यातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे?

    Ans: खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अमोल खोंडे यांच्याशी संबंधित कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Que: व्हायरल व्हिडिओमध्ये नेमका काय आरोप करण्यात आला आहे?

    Ans: हाणामारीच्या प्रकरणात एकतर्फी कारवाई केल्याचा आणि दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: यापूर्वीही अमोल खोंडे यांच्याशी संबंधित प्रकरण समोर आले होते का?

    Ans: होय. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे एसीपी विजय मराठे यांनी सांगितले होते. 

Web Title: Khadakpada police officer amol khonde viral video complaint refusal kalyan sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन
2

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
3

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.